आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराची : 17.43 कोटींच्या स्मार्टफोनचा कंटेनर जप्त; लाइट्स-बल्ब सांगून बेकायदा आयातीचा ठपका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- पाकिस्तानातील कस्टम अधिकाऱ्यांनी एका कंटेनरमधून मोठ्या संख्येत बेकायदा स्मार्टफोन व टॅब्लेट जप्त केले. भारतीय चलनानुसार बाजारात त्याची एकूण किंमत १७.४३ कोटी रुपये आहे. त्यात क्यू मोबाइलचे महागडे मोबाइल फोन व टॅब्लेट्सचा समावेश आहे.  

एलईडी-बल्ब सांगून त्याची आयात केली जात होती. तपास अधिकाऱ्यांना त्याबद्दलची माहिती मिळताच काही ग्रीन सुविधेचा दुरूपयोग केला जात आहे. त्याअंतर्गत पेपरलेस व्यवस्थेअंतर्गत आयातीला मंजुरी मिळवून बेकायदा आयात केली जात आहे. हा माल सद्दार भागातून ट्रॉलीवर लादण्यात आला होता. तपासानंतर त्यात ८.३३ कोटी रुपयांचे क्यू-मोबाइल कंपनीचे २७ हजार २०० मोबाइल फोन, ८.७७ कोटी रुपयांचे ३५ हजार ७९० इतर मोबाइल फोन व ३३ लाख रुपयांचे ५३१ टॅब्लेट लादून माल नेला जात होता. 
 
- ट्रकमधून चोरी झाले दोन कोटींचे  ३०० हून अधिक आयफोन-एक्स सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तीन चोरट्यांनी अॅपलच्या एका दुकानाबाहेर उभ्या ट्रकमधून ३१३ नवीन आयफोन-एक्स लांबवले. त्यांची एकूण किंमत ३.७० लाख डॉलर (दोन कोटी रुपये) एवढी आहे. ट्रक फोन डिलिव्हरी करण्यासाठी पोहोचले होते. अमेरिकेत आयफोन-एक्सची किंमत सुमारे ६५ हजार आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...