आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, सोनिया गांधींनी का केले होते राजीव गांधी यांच्याशी लग्न...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 71 वी जयंती आहे. भारतात संगणक क्रांती घडवून आणण्याचे श्रेय राजीव यांना दिले जाते. त्यांनी तरुणांसाठी भरीव काम केले. 20 ऑगस्ट 1944 रोजी त्यांचा मुंबईत जन्म झाला होता. या निमित्त आम्ही घेऊन आलोय, सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांची प्रेमकहाणी...
काँग्रेसच्‍या राष्‍ट्रीय अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे प्रेम असल्‍याचे सर्वश्रुत होते. पण, त्‍यांचे प्रेम कसे फुलले. सोनिया या राजीव यांच्‍या प्रेमात कशा पडल्‍या. यावर एका पाकिस्‍तानी लेखकाने आपल्‍या पुस्‍तकातून प्रकाश टाकला आहे.
पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री आणि लेखक खुर्शिद महंमद कसुरी यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची आठवण सांगितली आहे. राजीव गांधी सुंदर, तरुण होते. त्यामुळे आपण त्यांच्याशी विवाह केल्याचे सोनिया एकदा गमतीने त्यांना म्हणाल्या होत्या, असे कसुरी यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

"नायदर अ हॉक नॉर अ डव्ह' मध्ये त्यांनी २००५ मध्ये सोनिया यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला आहे. कसुरी यांनी परवेझ मुशर्रफ यांच्या भारत दौऱ्याचा संदर्भ दिला आहे. मुशर्रफ यांना भेटण्यासाठी आलेल्या सोनिया यांचे कसुरी यांनी स्वागत केले होते. सोनिया यांच्यासोबत तत्कालीन परराष्ट्रमंत्री नटवरसिंगही होते.

पुढील स्‍लाइडवर वाचा राजीवजींना पाहिल्याची आठवण....
बातम्या आणखी आहेत...