आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Soran Singh MPA Of PTI In KPK Assembly Killed In Khyber Pakhtunkhwa

PAK च्या शीख नेत्याचा तालिबान्यांकडून खून, इम्रान म्हणाला- मोठे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वाह विधानसभेचे शीख सदस्य सोरनसिंग यांची शुक्रवारी हत्या करण्यात आली. बुनेर जिल्ह्यात ते घरी परतत असताना पीर बाबा येथे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सोरेनसिंग हे पाकिस्तानातील ज्येष्ठ राजकीय नेते आणि खैबर पख्तूनख्वाहमध्ये अल्पसंख्याक व्यवहाराचे स्पेशल असिस्टंट होते.

तहरीक-ए-तालिबानने घेतली जबाबदारी
- बुनेरचे पोलिस अधिकारी खालिद हमदनी यांनी न्यूज एजन्स एएफपीला सांगितले, 'दोन बाइकस्वार त्यांच्या कारजवळ आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. सोरनसिंग यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यात आणि डोळ्यात गोळ्या लागल्या होत्या.'
- तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने त्यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे.
कोण होते सोरनसिंग
- सोरनसिंग यांनी 2011 मध्ये तहरीक-ए-इन्साफ पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी ते जमात-ए-इस्लामचे सदस्य होते.
- व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सोरनसिंग यांनी तीन वर्षे पश्तोच्या एका टीव्ही चॅनलसाठीही काम केले होते.
- ते पाकिस्तानात शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या तहसील कौन्सिलचे आणि प्रॉपर्टी बोर्डचे सदस्य होते.
- खैबरच्या एका वृत्तवाहिनीसाठी 'जह हम पाकिस्तान यम' अर्थात 'मी पाकिस्तानी आहे' हा कार्यक्रम तीन वर्षे होस्ट केला होता.

तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांनी ट्विटवर व्यक्त केला शोक
- तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांनी सोरनसिंग यांच्या हत्येचा निषेध करत ट्विटवर शोक व्यक्त केला.
- ते म्हणाले, 'सोरनसिंगची हत्या का झाली असेल, याचे आश्चर्य वाटते. खैबर पख्तूनख्वा प्रशासनाने त्वरित त्याची चौकशी केली पाहिजे. त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. '
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोरनसिंग यांचे पाकचा झेंडा घेऊन फोटो