आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: महापुराने उडवली होती लोकांची झोप, पाहून तुम्हालाही बसेल धडकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात आतापर्यंत 169 लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर 112 जण बेपत्ता झाले आहेत. - Divya Marathi
श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात आतापर्यंत 169 लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर 112 जण बेपत्ता झाले आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- श्रीलंकेत मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात आतापर्यंत 169 लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर 112 जण बेपत्ता झाले आहेत. 2003 नंतर प्रथमच एवढा मोठा महापूर श्रीलंकेत आला आहे. श्रीलंकेतील पूर्वेकडील 15 जिल्ह्यातील सुमारे पाच लाख लोकांना या महापुराचा तडाखा बसला आहे. यातील सुमारे 1 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सुरक्षा दले व आपत्ती निवारण दलाचे व्यवस्थापन शोध आणि मदतकार्य सुरुच आहे.
 
गेल्या वर्षी अमेरिकेच्या टेक्सास आणि ओक्लाहामामध्‍ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे शेकडो लोकांचा असाच मृत्यू झाला होता. यातील काही जण ह्यूस्टनमधील होते. पुरामुळे रस्त्यांचे नद्यांमध्‍ये रुपांतर झाले होते. जवळ-जवळ एक हजार लोक पाण्‍यात फसले होते. प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. एवढेच नाही तर एकट्या ह्यूस्टनमध्‍ये दीड हजारांवर गाड्या वाहून गेल्या होत्या. टेक्सासमध्‍ये वादळामुळे शेकडो घरे उद्ध्‍वस्त झाली होती तर अनेक लोक बेपत्ता झाली होती. बेपत्ता लोकांना नंतर स्थानिक प्रशासनाने मृत घोषित केले होते.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, अमेरिकेत गेल्या वर्षी आलेल्या पूरामुळे ओढावलेली बिकट परिस्थिती...ज्याचे फोटो पाहून तुम्हालाही भरेल धडकी....
बातम्या आणखी आहेत...