आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गद्दाफी स्टेडियमबाहेर आत्मघाती हल्ला, २ ठार; आत सुरू होता पाक-झिम्बाब्वे सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानच्या लाहोरमध्ये शुक्रवारी रात्री गद्दाफी स्टेडियमबाहेर आत्मघाती हल्ला झाला होता. शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियमवर स्फोट करण्यासाठी येत असलेल्या आत्मघाती हल्लेखोराला एका पोलिसाने एक किमी दूरवरच रोखले. हल्लेखोराने तेथेच स्वत:ला उडवले. त्यात हल्लेखोर, तो पोलिस आणि एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला, पण स्टेडियम आणि तेथे उपस्थित हजारो दर्शक आणि खेळाडू बचावले. रात्री नऊ वाजता झालेल्या या घटनेच्या वेळी पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात क्रिकेट सामना सुरू होता.

माहिती मंत्री परवेज रशीद यांनी सांगितले की, स्टेडियमपासून एक किमी दूर कलमा चौकाजवळ हा स्फोट झाला. विजेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाला आहे, असे आधी पाकिस्तानी क्रिकेट मंडळ आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले होते. प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये दहशत पसरू नये म्हणून तसे सांगण्यात आले होते. त्या वेळी स्टेडियममध्ये जवळपास २० हजार प्रेक्षक होते.

२००९ नंतर आलेला पहिला संघ
पाकिस्तानात मार्च २००९ मध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट सामन्यावेळी लाहोरमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्या वेळी सहा पोलिस व वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाकिस्तान दौऱ्यावर येणारा झिम्बाब्वेचा पहिला संघ होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पाक - िझम्बाब्वे सामन्याला मालिकेचा दर्जा दिला होता, परंतु कुणी सामनाधिकारी पाठवला नव्हता. झिम्बाब्वे संघाला पंजाब सरकारने विशेष सुरक्षा दिली असून संघाने पुढील सामने खेळणार असल्याचे जाहीर केले आहे.

बसमधून उतरवून २२ प्रवाशांची हत्या
दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा क्वेट्टाहून कराचीला जात असलेल्या दोन बसमधील प्रवाशांना खाली उतरवून त्यांचे अपहरण केले. नंतर त्यांच्यापैकी २२ जणांचे मृतदेह कराची महामार्गालगत आढळले. दहशतवादी सुरक्षा रक्षकांच्या युनिफॉर्ममध्ये आले होते. या महिन्याच्या सुरुवातीला कराचीत ४३ प्रवाशांची हत्या करण्यात आली होती. त्या वेळी दहशतवाद्यांनी आपण इस्लामिक स्टेटशी संबंधित असल्याचा दावा केला होता. मृतांतील सर्व जण अल्पसंख्याक शिया इस्लामिक होते.
बातम्या आणखी आहेत...