आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK: दर्ग्यात दहशतवाद्याने फेकला ग्रेनेड; फुटला नाही तर घेतले स्वत:ला उडवून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- पाकिस्तानातील सिंध प्रांतात सुफी संत शाहबाज कलंदर यांच्या दर्ग्यावर गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 100 हून अधिक लोक ठार झाले आहेत. 250 हून अधिक लोक जखमी आहेत. दर्ग्यात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवून घेतले. हल्ला झाला तेव्हा वेळी शेकडो भाविक दर्ग्यात होते. पोलिसांनी हल्लेखोराची माहिती देणार्‍यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

इसिसने या हल्लाची जबाबदारी स्विकारली आहे. या वेळी आणखी एक हल्लेखोर सोबत होता. मात्र, पोलिसांनी त्याला तत्काळ गोळ्या घातल्या. या दर्ग्यापासून रुग्णालय 50 किमी दूर असल्याने मदत पोहचण्यास विलंब झाला. त्यामुळे मृतांची संख्या वाढली. गेल्या सात दिवसांत पाकिस्तानात झालेला हा पाचवा मोठा स्फोट आहे. दर्ग्यातील महिलांसाठी राखीव असलेल्या भागामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

दोन हल्लेखोरांनी हा स्फोट घडवून आणल्याचे सीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एका दहशतवादीने दर्ग्यात बॉम्ब फेकले. मात्र, ब्लास्ट न झाल्याने त्याने स्वत:ला बॉम्बने उडवून घेतले. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'नुसार, दर्ग्यात महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भागात हा आत्मघातकी हल्ला झाला.

2005 नंतर देशभरातील 25 दर्ग्यावर झाले दहशतवादी हल्ले...
- पोलिसांनी हल्लेखोराची माहिती देणार्‍यास 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
- 2005 नंतर देशभरातील 25 दर्ग्यांवर दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. 
- हैदराबादचे आयुक्त काझी शाहिद यांनी सांगितले की, शाह कलंदर यांची दर्गा हैदराबादपासून 130 किमी अंतरावर आह. जखमींना मदत करण्‍यासाठी अॅम्ब्युलन्स, मेडिकल टीम पाठवण्यात आल्या होत्या. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुठे झाला ब्लास्ट?
- दर्ग्यातील सहवान शरीफ भागात हा ब्लास्ट झाला. कराचीपासून हा दर्गा 200 किमी अंतरावर आहे. 
- दर्ग्यापासून 50 किमी परिसरात एकही हॉस्पिटल नाही. 
- सिंध प्रातांचे मुखमंत्री सैयद मुराद अली शाह यांच्या परिसरात हा दर्गा आहे. 
- हल्ल्यानंतर बादपूरे सिंध प्रांतातील इतर दर्ग्याच्या सुरक्षेत वाढ करण्‍यात आली आहे.
 
दर्ग्याला बसवले आहेत सोन्याचे दरवाजे...
- शाहबाज कलंदर याच्या मझारवर 1356 इ.स.पूर्व दर्गा बांधण्यात आली होती. इराणचे शाह मुहम्मद रजा पहलवी यांनी दर्ग्याला सोन्याचे दरवाजे बसवले होते. 
- गुरुवारी भाविक मोठ्या संख्येने येतात.
- सूफी संत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात खूप लोकप्रिय आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून फोटोजमध्ये पाहा, दर्ग्यातील विदारक दृश्ये

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...