आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये जाणार, सुषमा स्वराज यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - सार्क परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील वर्षी पाकिस्तानला भेट देणार आहेत, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज (बुधवार) दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुषमाही राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आज 'हार्ट ऑफ एशिया कॉन्फ्ररन्स सुरु झाली आहे. दहशतवाद्यांना पाठीशी घालून दहशतवादाला खतपाणी देऊ नका, असे खडे बोल भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले. इस्लामाबादमध्ये 'हार्ट ऑफ एशिया कॉन्फरन्समध्ये सुषमा संबोधित करत होत्या. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ उपस्थित होते.

कॉन्फरन्स दरम्यान, सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली. दहशतवाद हा सगळ्यांच्या शत्रू आहे. अफगणिनिस्तानातील शांततेसाठी सगळांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे नवाझ शरीफ यांनी आपल्या भाषणात सांगितले.

अफगणिस्तान-पाकिस्तानसोबत व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारत तयार आहे. पाकिस्तान व भारताने प्रांतीय वाद नष्ट करून व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्‍यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करण्याची वेळ आता आली आहे.

संपूर्ण जगाला परिवर्तनाची प्रतिक्षा आहे. त्यामुळे भारत-पाक या दोन्ही देशांच्या संबंधांकडे जगाचे लक्ष लागले आहे. जगाला नाराज करून चालणार नसल्याचे सुषमा स्वराज म्हणाल्या. पाकिस्तानसाठी पीस प्रोसेसमध्ये सहकार्य करण्यासाठी भारत नेहमी तयार आहे.
अफगणिस्तान दहशतवादात चांगलाच होरपळला आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करणारी जनता य अफगाणचे जवानांचे कार्य प्रशंसनीय आहे.

शरीफ यांच्या भाषणातील मुद्दे...
- नवाज म्हणाले की, अफगानिस्तानच्या विकासासाठी सर्व संबंधित देशांनी मिळून काम करायला हवे. “हार्ट ऑफ एशिया” चा उद्देश या क्षेत्रातील देशांना आपसांत जोडणे आणि विकास करणे हा आहे. या परिषदेकडे अफगाणिस्तानच्या मुद्द्याबरोबरच जगाला जोडण्याचा एक प्रयत्न म्हणूनही पाहिले जाते.

- आम्हाला शेजाऱ्यांशी शांततेचे संबंध हवे आहेत. विकासासाठी शांती गरजेची असते. शेजारी देशांनी पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट अधिक चांगले बनवायला हवे. अफगाणिस्तान एक लोकशाही देश आहे आणि आमचा शेजारीही आहे. आम्हाला त्याठिकाणी शांतता आणि विकास हवा आहे. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगाने पाकिस्तानची मदत करावी.

- आण्ही दहशतवाद्यांच्या विरोधात ‘जर्ब-ए-अज्ब’ मोहीम काबवली चालवले. त्याचे चांगले पाहायला मिळाले. आम्ही दीर्घ काळापासून अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण दहशतवाद हा सर्वांचा शत्रू आहे.

- शरीफ म्हणाले, मला आशा आहे की या परिषदेत सहभागी होणारे सर्व परराष्ट्र मंत्री आपसांतील सहकार्याच्या आणि विकासाच्या मुद्दयावर चर्चा करतील. आपण केवळ विकासावर लक्ष केंद्रीत करायला हवे.

सुषमा स्वराज यांचे नियोजित कार्यक्रम
- बुधवारी सुषमा इस्लामाबादेत पाचव्या 'हार्ट ऑफ एशिया' परिषदेत सहभागी होती.
- परिषदेनंतर सुषमा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही भेटतील.
- भारत-पाकिस्तान यांच्यातील नात्याबाबत त्यांची नवाज शरीफ आणि अजिज यांच्याशी चर्चा होईल. इस्लामाबादेत पोहोचताच त्यांना याबाबत संकेत देण्यात आले होते.
अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पाकिस्तानातील "हर्ट ऑफ एशिया' परिषदेला मंगळवारी प्रारंभ झाला. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज परिषदेत सहभागी होत आहेत.

ही पाचवी परिषद असून प्रादेशिक सहकार्याबरोबरच सुरक्षा क्षेत्रात या देशांमध्ये सहकार्य वाढीस लागावे या हेतूने पाकिस्तानात या परिषदेचे आयोजन केले जाते. पाकिस्तानी पंतप्रधानांचे सल्लागार सरताज अजीज व अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री खलील करझाई यांनी बैठकांचा श्रीगणेशा केला.

आज परराष्ट्र मंत्र्यांची बैठक : बुधवारी "हर्ट ऑफ एशिया' परिषदेत सदस्य आशियाई देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक होत असून या बैठकीचे उद्घाटन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांच्या हस्ते होईल.
हे आहेत सदस्य देश
या परिषदेच्या सदस्य देशांत पाकिस्तान, अफगाणिस्तान, अझरबैजान, चीन, भारत, इराण, कझाकिस्तान, किरगिझस्तान, रशिया, सौदी अरब, तजाकिस्तान, तुर्की, तुर्कमेनिस्तान आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा समावेश आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित PHOTO