आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलाहुद्दीनची भारताला धमकी, काश्मीर मुद्दा सोडवा अन्यथा अणुयुद्धाला सामोरे जा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सलाहुद्दीन - Divya Marathi
हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सलाहुद्दीन
इस्लामाबाद - दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सलाहुद्दीनने काश्मीर मुद्दद्यावरुन पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. सलाहुद्दीनने रविवारी म्हटले, 'काश्मीर मुद्दा सोडविला नाही तर भारत - पाकिस्तान यांच्यात न्यूक्लिअर वॉर होऊ शकतो. त्याने म्हटले आहे की काश्मीरींची साथ देण्यासाठी तयार आहे.

कोण आहे सलाहुद्दीन
- जम्मु-काश्मीरमध्ये नुकताच मारला गेलेला दहशतवादी बऱ्हान वानी हा ज्या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता त्या हिज्बुल मुजाहिदीनचा सलाहुद्दीन प्रमुख आहे.
- केंद्रीय गृहमंत्री नुकतेत पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात काढण्यात आलेला मोर्चा घेऊन सलाहुद्दीन वाघा बॉर्डरपर्यंत आला होता.
- 8 जुलैला वानीचा एन्कांऊटर झाल्यापासून सलाहुद्दीन चिथावणीखोर भाषणे करत आहे. पाकिस्तानच्या भूमीवरुन तो भारताला धमकावत आहे.
- एका पत्रकार परिषदेत तो म्हणाला होता, 'जर आंतरराष्ट्रीय समुदायाने काश्मीर मुद्द्याकडे दुर्लक्ष्य केले तर पाकिस्तान स्वतः भारताला रोखण्याचा प्रयत्न करेल.'
बातम्या आणखी आहेत...