आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 महिन्यांपूर्वीच पेशावरमध्ये झाला होता बालसंहार, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानमधील प्रमुख शहर असलेल्या कराचीमध्ये आज सकाळी दोन ते तीन मोटरसायकलवरून आलेल्या पाच ते सहा दहशतवाद्यांनी एक बस रस्त्यात अडवून बसवर केलेल्या हल्ल्यात सुमारे 47 जण ठार झाले आहेत. अशाच प्रकारचे क्रूर आणि अमानवीय कृत्य दहशतवाद्यांनी 16 डिसेंबर 2014ला पेशावरमध्ये छावणी भागात असलेल्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये केले होते. तालिबानच्या दहशतवाद्यांनी 132 निरागस मुलांसह 145 नागरिकांची निर्घृण हत्या केली होती.

निरागस-निशस्त्र मुलांवर दहशतवाद्यांनी प्रत्येक क्लासमध्ये घुसून गोळीबार केला होता. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर जीवाच्या अकांताने धावत सुटलेल्या विद्यार्थ्यांवरही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. जोपर्यंत मुले जमीनीवर कोसळत नाहीत, तोपर्यंत दहशतवादी त्यांच्यावर गोळ्या झाडत होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, मन सुन्न आणि विचलित करणारी छायाचित्रे..