आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाण सरकार व तालिबानमध्ये शांतता करारासाठी सिक्रेट मीटिंग, पाकिस्तानला टाळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुमारे 5 महिन्यानंतर तालिबान आणि अफगान सरकारमध्ये शांती वार्ता सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांत कतारमधील दोहामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळात दोन मिटिंग झाल्या. - Divya Marathi
सुमारे 5 महिन्यानंतर तालिबान आणि अफगान सरकारमध्ये शांती वार्ता सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांत कतारमधील दोहामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळात दोन मिटिंग झाल्या.
काबूल- सुमारे 5 महिन्यानंतर तालिबान आणि अफगाण सरकारमध्ये शांती वार्ता सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांत कतारमधील दोहामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळात दोन मिटिंग झाल्या. विशेष म्हणजे, या मीटिंग्सपासून पाकिस्तानला दूर ठेवले गेले. मे 2016 मध्ये अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात शांतता चर्चा मतभेदामुळे थांबली होती. दरम्यान, अफगानिस्तान सरकारने सिक्रेट मीटिंगचा इन्कार केला आहे. कोण कोण होते या मीटिंग मध्ये.....

- ब्रिटिश न्यूजपेपर गॉर्डियनच्या वृत्तानुसार, या मीटिंगमध्ये अमेरिकन डिप्लोमॅट, माजी तालिबान चीफ मुल्ला उमरचा भाऊ मुल्ला अब्दुल मन्नान आणि अफगान सरकारचे प्रतिनिधी सामील होते.
- याबाबत सांगितले जात आहे की, ही मिटिंग्स यूएस ऑफिशियलच्या मदतीने झाली. कारण याधी तालिबान थेट सरकारसोबतच बोलण्यावर अडला होता.
पाच महिन्यानंतरही पुन्हा चर्चा सुरु-
- याआधी, मे 2016 मध्ये मुल्ला अख्तर मसूरची ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर दोन्ही पक्षांतील चर्चा थांबली होती.
- या रिपोर्टच्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये झालेली मीटिंग खूपच सकारात्मक झाली.
- पाकिस्तानला या मीटिंगपासू दूर ठेवण्याचे कारण म्हणजे अफगाण सरकारसमवेत मागील काही दिवसापासून पाकचे संबंध तितकेसे चांगले नाहीत.
- भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील चांगल्या संबंधामुळे पाकिस्तान नाराज आहे. तसेच अफगानने भारतापासून दूर राहावे ही पाकची मागणी अफगान सरकारने धुडकावून लावली आहे.
- पाकिस्तान दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप अफगानिस्तान नेहमीच करत आला आहे. याशिवाय इतर मुद्यांमुळे अफगाणने पाकला मिटिंगपासून दूर ठेवले.
- यूएस आणि अफगानिस्तानचा आरोप आहे की, पाकिस्तान तालिबानला नेगोशिएशन टेबलवर येण्यापासून रोखत आहे.
- अफगान प्रेसिडेंट अशरफ घानी यांच्या एका निकटवर्तीयाने सांगितले की, अफगानिस्तान सरकार आणि तालिबान हे पाकिस्तानच्या डबल ढोलकीच्या भूमिकेवर नाराज आहेत. इस्लामाबाद दोघांशी डबल डीलिंग करत आहे. आता दोघांनाही पाकिस्तानची मदत किंवा भूमिका यात नको असे वाटू लागले आहे. पाकने नेहमीप्रमाणे डबल ढोलकीचे आरोप फेटाळून लावले आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...