आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी अतिरेक्यांनी पाक लष्कराचे हेलिकॉप्टर पाडले, २ राजदूतांसह ११ जणांचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - तालिबानी दहशतवाद्यांनी शुक्रवारी पाकिस्तानच्या लष्करी हेलिकॉप्टरवर हल्ला करून ते पाडले. शुक्रवारच्या या घटनेत दोन राजदूतांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांना लक्ष्य करण्यासाठी हल्ला करण्यात आला होता. सुदैवाने शरीफ सुरक्षित आहेत.

हल्ल्याची जबाबदारी तेहरिक-ए-तालिबानने स्वीकारली आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मिरच्या बाल्टीस्तान विभागात हल्ल्याची घटना घडली. हल्ल्यानंतर एमआय-१७ हेलिकॉप्टर गिलगिट भागातील एका शाळेच्या इमारतीवर पडले. त्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. घटनेत नॉर्वेचे राजदूत लीफ एच. लार्सन आणि फिलिपीन्सचे राजदूत डोमिंगो डी. लुसेनारियो ज्युनिअर यांचा मृत्यू झाला. मलेशिया व इंडोनेसियाच्या राजदूतांच्या पत्नी व दोन पायलटचा देखील मृतांत समावेश आहे. जखमींमध्ये पोलंड आणि नेदरलँडचे राजदूतचा समावेश आहे. हेलिकॉप्टरमध्ये ११ परदेशी आणि सहा पाकिस्तानी नागरिक होते. हे सर्व मुत्सद्दी एका विशिष्ट योजनेची सुरूवात करण्यासाठी गिलगिटला गेले होते. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असीम बाजवा यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. शरीफ दुस-या हेलिकॉप्टरमध्ये बसलेले होते. हल्ल्यानंतर शरीफ इस्लामाबादला परतले.