आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानचा म्होरक्या मन्सूर कंदहार अपहरणाचा मास्टरमाइंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- तालिबान दहशतवादी संघटनेचा नवीन म्होरक्या मुल्ला अख्तर मोहंमद मन्सूरचा १९९९ मध्ये झालेल्या भारतीय विमानाच्या अपहरणामागे हात होता. त्यादरम्यान मन्सूर अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारमध्ये नागरी उड्डाण मंत्री होता. तत्कालीन सरकारचे मुख्यालय कंदहारमध्ये होते.

भारतात बंद असलेल्या दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी मन्सूरने आयएसच्या मदतीने विमान अपहरणाचा कट रचला होता. त्यानेच नंतर अपहरणकर्ते आणि भारत सरकार यांच्या मध्यस्थीचे नाटक केले होते, असा दावा ‘संडे एक्स्प्रेस’ च्या वृत्तातून करण्यात आला आहे. विमानाच्या अपहरणासाठी अपहरणकर्ते मिठाईच्या डब्यात पिस्तूल घेऊन विमानात दाखल झाले होते. विमानात स्वयंचलित शस्त्रेदेखील होती. विमानातूनच त्याचा पुरवठा करण्यात आला होता.
अमेरिकेच्या तावडीतून पलायन
मन्सूरचे अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्याशी जवळचे संबंध होते. २००१ मध्ये मन्सूरने आत्मसमर्पण केले होते. हमीद करझाई सरकारच्या काळात तो शांततापूर्वक आपल्या घरी राहण्यास गेला. परंतु अमेरिकेने त्याच्या ठिकाणांवर हल्ले केले होते. त्यानंतर तो पाकिस्तानला पळाला.
बातम्या आणखी आहेत...