आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंदुत्वच पाकचे मोदींविरुद्ध शस्त्र, आखली २२ कलमी योजना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेट पॅनलच्या रिपोर्टमध्ये काश्मिरमध्ये भारतीय सैन्याकडून होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत चर्चा करण्यात आली आहे. - Divya Marathi
सिनेट पॅनलच्या रिपोर्टमध्ये काश्मिरमध्ये भारतीय सैन्याकडून होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत चर्चा करण्यात आली आहे.
इस्लामाबाद - बलुचिस्तानच्या मुद्द्यावरून दुखावलेल्या पाकने आता रा. स्व. संघ हिंदुत्ववादी विचारसरणीवरून पंतप्रधान नरेंेद्र मोदी यांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. पाक मीडियानुसार संसदेच्या एका महत्त्वाच्या समितीने भारताच्या ‘कमकुवत’ बाजू उघड करण्याच्या रणनीतीची शिफारस केली आहे. यानुसार २२ सूत्री कार्यक्रमास पाक संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने शुक्रवारी मंजुरी दिली. यात मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि दलित हे भारतात कसे वेगळे पडत आहेत, याचे दाखले देत भारताची कमकुवत बाजू जगासमोर आणि भारतातील जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असेपर्यंत दोन्ही देशांतील संबंध सुधारणे अशक्य आहे, असे मत पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटले आहे.

आयएसआय प्रमुखास हटवण्याची तयारी : दहशतवादाच्या उच्चाटनासाठी मोहिमेत पाक सरकारने या दहशतवाद्यांना पोसणारी पाकची गुप्तहेर संघटना आयएसआयवर फास आवळण्याचे ठरवले आहे. याचा पहिला घाव आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांच्यावर बसेल. त्यांना लवकरच पद सोडावे लागणार आहे.
पुढे वाचा, रिपोर्टमध्ये काश्मिरबाबत काय म्हटले आहे...
बातम्या आणखी आहेत...