आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हँडसम असल्याने या पाकिस्तानी टीचरने गमावली नोकरी, स्टायलिश मिशांमुळे आहे चर्चेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तान कधी कोण आणि कशावरून चर्चेत येणार काहीच सांगता येत नाही. पाकिस्तानी शाळेतील शिक्षक हसीब अली चिश्ती सध्या चर्चेत आहे. त्याचे कारण त्याच्या स्टायलिश मिशा आहेत. आपल्या स्टायश मिशांमुळे त्याने आपली नोकरी सुद्धा गमावली आहे. 
 

शालेय प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल
- चिश्ती यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून शालेय प्रशासनाच्या संकुचित विचारांवर सवाल उपस्थित केला आहे. शाळेने त्यांना नोकरीवर काढताना जे अजब कारण दिले, त्यावरून त्यांचे विचार किती संकुचित आहेत, हे स्पष्ट होत आहे. 
- शालेय प्रशासनानुसार, चिश्ती यांची स्टायलिश मिशी स्वतंत्रतावादी आणि उदार मतांना प्रोत्साहन देत होती. विद्यार्थ्यांच्या मनात त्या पाहून खुले विचार जागृक होण्याची भिती होती. 
- एवढेच नव्हे, तर त्यांचा हँडसम लूक पाहून शाळेतील महिला स्टाफ आणि विद्यार्थिनींचे मन भटकत होते.  
- लहान मुलांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे व्यासपीठ असलेल्या शाळांमध्ये अशा प्रकारचे संकुचित विचार कसे असू शकतात असा सवाल चिश्ती यांनी उपस्थित केला. पाकिस्तान एकीकडे पुढे जाऊन प्रगत होणार असे म्हणतो, मात्र आपले संकुचित विचार सोडण्यास मुळीच तयार नाही. 
- ज्या देशात स्त्री-पुरुषांनी एकमेकांशी बोलणे, डान्स करणे किंवा नाट्याला सुद्धा अश्लील म्हटले जाते, त्या ठिकाणी पुढे जाण्याची अपेक्षाच केली जाऊ शकत नाही असे चिश्ती म्हणाले. 
- हसीब अली चिश्ती यांनी इस्लामाबादच्या विविध शाळांमध्ये शिकवले आहे. ते पाकिस्तानात एक नाट्यगृह सुद्धा चालवतात. यात खुल्या विचारांना आणि सामाजिक बदलांना जागा दिली जाते. यासोबत ते आपली स्वतःची शाळा उघडण्याचा विचार करत आहेत, ज्या ठिकाणी खुल्या विद्यार्थ्यांच्या खुल्या विचारांना स्थान मिळेल. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, हसीब यांचे आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...