आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातील हे आहे ऐतिहासिक मंदिर, महादेवाच्या अश्रूपासून बनलेय कुंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटासराज मंदिर पाकिस्तानातील चकवाल गावाजवळून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर कटस नावाच्या पर्वतावर स्थित आहे. - Divya Marathi
कटासराज मंदिर पाकिस्तानातील चकवाल गावाजवळून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर कटस नावाच्या पर्वतावर स्थित आहे.
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बुधवारी पंजाब प्रांतातील ऐतिहासिक कटासराज मंदिराचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, पाकिस्तानला लवकरच अल्पसंख्यकांच्या हिताचे रक्षण करणारा देश म्हणून ओळखले जाईल. शरीफ यांनी मंदिराच्या पुनरुद्धाराचेही आदेश दिले आहेत. महादेवाची विविध मंदिरे जगभरात आहेत. यामधील काही मंदिरांचे निर्माण मनुष्यांनी केले आहे तर काही मंदिरे प्राचीन काळापासून स्थित आहेत. महादेवाचे असेच एक मंदिर पाकिस्तानात स्थित आहे. या मंदिराचे नाव आहे कटासराज मंदिर. पाकिस्तानात स्थित असलेले कटासराज शिव मंदिर 900 वर्ष जुने आहे. भगवान श्रीकृष्णने केलीय या मंदिराची निर्मिती...
 
- पाकिस्तानातील प्रांजाब प्रांतामधील चकवाल क्षेत्रामध्ये 910 वर्षांपूर्वीचे प्राचीन महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर श्रीकृष्णाने बांधल्याची आख्यायिका आहे.
- कटासराज मंदिर पाकिस्तानातील चकवाल गावाजवळून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर कटस नावाच्या पर्वतावर स्थित आहे.
- हे मंदिर महाभारत काळातही (त्रेतायुग) होते अशी मान्यता आहे. या मंदिराविषयी पांडवांशी संबंधित विविध कथा प्रसिद्ध आहेत.
 
महादेवाच्या अश्रू कुंडापासून बनलेय मंदिर-
 
- स्थानिक मान्यतेनुसार, वनवास काळात पांडवानी येथे जवळपास 4 वर्ष वास्तव्य करून या शिवलिंगाची उपासना केली होती. 
- हे मंदिर 900 वर्ष जुने असून मंदिराजवळ एक तलाव आहे. 
- या तलावाशी संबधित एक मान्यता अशी आहे की, सतीने आत्मदहन केल्यानंतर महादेव सतीचे शव घेऊन भ्रमण करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुंचे दोन थेंब पडले. 
- या अश्रुंपासून दोन कुंड तयार झाले. यामधील एक कुंड भारतातील पुष्कर क्षेत्रामध्ये ब्रह्म कुंड नावाने प्रसिद्ध आहे तर दुसरे कटासराज मंदिराजवळ आहे. 
- या कुंडाचे पाणी दोन रंगाचे आहे. तलावाची खोली कमी असलेल्या पाण्याचा रंग हिरवा असून खोल ठिकाणावरील पाणी निळ्या रंगाचे आहे.
 
तीन वर्षापूर्वी सुरु झाली होती या मंदिरात आरती-
 
- भारत-पाकिस्तान फाळणी काळात 1947 मध्ये हे मंदिर बंद करण्यात आले होते. 
- 2 जानेवारी 2014 रोजी या मंदिरात आरतीचे स्वर पुन्हा ऐकू आले होते. तेव्हापासून हे मंदिर खुले केले गेले आहे.
- पाकिस्तान सरकार या मंदिराची पुनर्स्थापना करून दोन हेतू साध्य करणाच्या विचारात आहे. 
- पहिला हेतू म्हणजे या मंदिराचा जीर्णोद्धार करून पर्यटनाचे मोठे केंद्र निर्माण करणे आणि दुसरा हेतू, पाकिस्तानात अल्पसख्यकांमध्ये भेदभाव केला जातो या आरोपाला खोडून काढणे. 
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्याम पाकिस्तानातील इतर काही प्राचीन शिव मंदिराविषयी....