आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK: शाहबाज कलंदर यांच्या दर्ग्यावर ISISचा भीषण हल्ला, 100 ठार 250 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानातील सिंध प्रांतात सुफी संत शाहबाज कलंदर यांच्या दर्ग्यावर गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात १०० हून अधिक लोक ठार, तर २५० पेक्षा अधिक जखमी झाले. दर्ग्यात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना एका आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवून दिले. या वेळी तेथे शेकडो भाविक होते.
 
दरम्यान, हा हल्ला इसिसच्या एका गटाने केला असल्याचे मानले जात आहे. या वेळी आणखी एक हल्लेखोर सोबत होता. मात्र, पोलिसांनी त्याला तत्काळ गोळ्या घातल्या. या दर्ग्यापासून रुग्णालय ५० किमी दूर असल्याने मदत पोहोचण्यास विलंब झाला. त्यामुळे मृतांची संख्या वाढली. गेल्या सात दिवसांत पाकिस्तानात झालेला हा पाचवा माेठा स्फाेट अाहे. दर्ग्यातील महिलांसाठी राखीव असलेल्या भागामध्ये हा स्फाेट झाल्याची माहिती समाेर येत अाहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, हल्ल्यानंतर पाकिस्तानात उडालेला हाहाकार... बघा विदारक फोटो....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...