आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात छोटू गँगची दहशत, ६ पोलिस ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानच्या पंजाब भागात पोलिस आणि छोटू गँगच्या गुंडात झालेल्या चकमकीत सहा पोलिस कर्मचारी ठार झाले आहेत.आधुनिक शस्त्रास्त्र आणि याेग्य हत्यारे नसल्याच्या संधीचा फायदा घेत या टोळक्याने २७ पोलिसांना बंदीही बनवले आहे. पोलिस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटू गँगने किती नागरिकांना बंदी बनवले याची अद्याप माहिती नाही, परंतु चकमकीत ७ गुंडही ठार झाले आहेत. मागील नऊ दिवसांपासून सुरू असलेली ही चकमक गुरुवारीही सुरू होती. पोलिसांनी "जर्ब-ए-अहान' नामक हे अभियान दक्षिण पंजाबमधील राजपूर जिल्ह्यात हाती घेतले आहे. गुंडांनी एका बेटावर कब्जा केला असून तेथूनच ते अशा घटना घडवून आणत आहेत. दरम्यान, या अभियानासाठी आपल्याकडे पुरे शस्त्र, बोटी नव्हत्या. स्थानिकांकडूनच दोन बोटी घेतल्या होत्या, अशी कबुली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, यापैकी एक बोट गुंडांनी नष्ट केली.
बातम्या आणखी आहेत...