आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या वर्षात पाकमधील दहशतवाद संपेल : शरीफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - २०१६ या नव्या वर्षात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा सफाया होईल व दहशतवादापासून दिलासा मिळेल, असा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी केला आहे. मकरान डिव्हिजनमध्ये गवादार, तलार व तुरबत भागातील कबायली जमातीच्या ज्येष्ठ नागरिकांपुढे राहील शरीफ बोलत होते.

जनरल शरीफ म्हणाले की, दहशतवाद्यांचा पूर्णपणे नि:पात करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराला जनतेने पूर्ण सहकार्य व समर्थन दिले पाहिजे. दहशतवाद, भ्रष्टाचार व गुन्हेगारी यांची एक अदृश्य युती असून दहशतवाद व आर्थिक भ्रष्टाचारात सहभागी घटकांनी एकमेकांना मदत करण्यासाठी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. ते संबंध उखडून फेकले पाहिजेत. तरच दहशवाद मोडीत निघू शकेल. जनरल शरीफ यांचे हे वक्तव्य देशांतर्गत दहशतवादी संघटनांसाठी इशारा असल्याचे म्हटले जात आहे.
बातम्या आणखी आहेत...