आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्जिकल स्ट्राइकनंतर दहशतवाद्यांची PAK मध्ये एकजूट, हाफिजसोबत दिसला हक्कानी नेता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - उरी हल्ला आणि भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये जणूकाही दहशतवाद्यांचा मेळावाच भरला होता. यात 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद, पाकमध्ये हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या समी उल हक आणि माजी आयएसआय चीफ हामिद गुलचा मुलगा अब्दुल्ला सहभागी होता. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने स्पष्ट वॉर्निंग दिली आहे की दहशतवाद्यांचा नायनाट करण्यात मिलिटरी आणि इंटेलिजेन्सने कोणतीही कुचराई करु नये. या पार्श्वभूमीवर होत असलेली दहशतवाद्यांच्या मिटिंगला महत्त्व प्राप्त झाले आहे.
हामिद गुलला मानले जाते दहशतवादाचा गॉडफादर
- दहशतवाद्यांच्या मिटिंगचा हा फोटो NewsX चॅनलने प्रसिद्ध केला आहे.
- हे सर्व दहशतवादी एकत्र येण्याचा अर्थ सर्जिकल स्ट्राइकनंतर ते मोठ्या हल्ल्याचे षडयंत्र रचत आहेत.
- हामिद गुलला दहशतवादाचा गॉडफादर मानले जाते. गेल्या वर्षी त्याचे निधन झाले होते. हाफिज सईदचा तो पाठिराखा मानला जात होता.
- आता हामिदचा मुलगा अब्दुल्ला आयएसआय आणि सईद यांच्यामधील दुवा असल्याचे मानले जाते. त्याचे हिजबूल मुजाहिदनसोबतही चांगले संबंध असल्याचे बोलले जाते.
बातम्या आणखी आहेत...