आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorist Groups In Pakistan, Bacha Khan University Attack

ही आहेत पाकिस्तानमधील टॉप दहशतवादी संघटना, गुप्तचर संघटना करतात मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तालिबानी दहशतवादी (फाइल फोटो) - Divya Marathi
तालिबानी दहशतवादी (फाइल फोटो)
पाकिस्तानच्या चारसद्दा येथील बाचा खान विद्यापीठावर बुधवारी(ता.20) दहशतवादी हल्ला झाला. तहरीक ए तालिबान पाकिस्तान(टीटीपी) या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्‍या लष्‍करी मोहिम संपली आहे. मात्र शोध मोहिम चालू आहे. अनेक दहशतवादी हल्ले होऊनही पाकिस्तान आपल्या देशातील दहशतवादी संघटनांविरुध्‍द कडक पावले उचलताना दिसत नाही. यानिमित्त तुम्हाला या देशातील टॉप दहशतवादी संघटनांविषयी सांगणार आहोत.
तर चला जाणून घेऊ या..
कोण आहे तालिबान, त्याचा अर्थ काय?
- पश्‍तो शब्द तालिबनपासून तालिबान हा शब्द बनला आहे. त्याचा अर्थ विद्यार्थी असा होतो.
- तालिबान अफगाणिस्तानमधील कट्टर इस्लामी राजकीय आंदोलन आहे.
- ती 1996 ते 2001 पर्यंत अफगाणिस्तानमध्‍ये सत्तेत होते.
- 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला करुन तालिबानला सत्तेवरुन पाय उतार केले.
- सत्तेत असताना त्यांनी कट्टर शरिया कायदे लागू केले होते .
पाकिस्तानवर का आहे नाराजी?
- दहशतवादी संघटनांचा कल पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका राहिली आहे. मात्र टीटीपीचा या देशाबाबत जहाल भूमिक राहिली आहे.
- वास्तविक टीटीपीला वाटते, की पाकिस्तान अमेरिकेचा गुलाम आहे. येथील नेते देशाचे आरोपी आहेत.
- याच कारणामुळे ही दहशतवादी संघटना पा‍किस्तान नेत्यांचा शत्रू क्रमांक एक आहे.
- त्यांचा म्होरक्या हकीमुल्ला मसूदच्या मृत्यूच्या बदल्यात पाकिस्तानी नेत्यांना अमेरिकेकडून 5 कोटी डॉलर रुपये मिळाले होते.
- वझीरिस्तानमध्‍ये या दहशतवादी संघटनेची पळेमुळे वाढली असून ते संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचे मानले जाते.
सर्वांनी बंदी घातली होती
- 1 सप्टेंबर, 2010 रोजी अमेरिकेने या टीटीपीला धोकादायक दहशतवादी गटाच्या यादीत टाकले होते.
- 18 जानेवारी, 2011 रोजी ब्रिटनने या संघटनेवर बंदी घातली.
- 5 जुलै, 2011 रोजी कॅनडाने टीटीपीला काळ्या यादीत टाकले.
- पाकिस्तानचा दावा आहे, की त्याने 25 ऑगस्ट, 2008 रोजी संघटनेवर बंदी घातली होती.
30 हजारापेक्षा जास्त सदस्य संख्‍या
- पाकिस्तानच्या फेडरल अॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाजची(फाटा) सर्व सातही जिल्हे आणि खैबर पख्‍तूच्या अनेक जिल्ह्यात टीटीपीचे सदस्य आहेत.
- उत्तर वझीरिस्तानमध्‍ये या दहशतवादी संघटनेचे मुख्‍यालय आहे.
- एका अंदाजानुसार टीटीपीची 30 हजार ते 35 हजार सदस्य आहेत.
तिचे उद्देश काय आहे?
- पाकिस्तानात शरियावर आधारित इस्लामी कायदे लागू करायची आहेत.
- 2007 मध्‍ये 13 दहशतवादी संघटनांनी मिळून तिची स्थापना केली होती.
- पाकिस्तानच्या बैतुल्ला महसूद नावाच्या कुविख्‍यात दहशतवाद्याने टीटीपीची स्थापना केली होती.
- टीटीटीचे तळ पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील आदिवासी भागात आहे.

भारतातही लागू करु इच्छिते शरिया
- जानेवारी, 2013 मध्‍ये टीटीपीने म्हटले होते, की ते भारतात शरिया कायदे लागू इच्छित आहे.
- या कारणामुळे ही संघटना काश्‍मीरमध्‍ये सक्रिय होण्‍याचा प्रयत्न करीत आहे.
बातम्यात यामुळे
- 16 डिसेंबर, 2014 रोजी पेशावरमधील लष्‍करी शाळेवर हल्ला करुन टीटीपी बातम्यात झळकली होती.
- या हल्ल्यात 132 निष्‍पाप जीवांचा गमवावा लागला होता.
- यानंतर पाकिस्तान सरकारने या संघटनेच्या दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पाकिस्तानमधील इतर दहशतवादी संघटनांविषयी...