आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिहादमुळेच ब्रिटन झाला EU पासून वेगळा, दहशतवादी हाफिज सईदचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फैसलाबाद - युरोपियन यूनियनमधून ( ईयू) ब्रिटन बाहेर पडला. या मागे जिहाद हेच एकमेव कारण आहे असा दावा, जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदने केला. एवढेच नाही तर ब्रेक्जिटनंतर जागतिक शेअर मार्केटमध्‍ये झालेल्‍या घसरणीबाबतही त्‍याने आनंद व्‍यक्‍त केला. दरम्‍यान, ब्रिटनपासून लंडनला वेगळे करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. या बाबत दाखल ऑनलाइन याचिकेवर आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक लोकांनी स्‍वाक्षरी केली आहे.
हाफिजने अजून काय म्‍हटले...
> पाकिस्तानच्‍या फैसलाबादमध्‍ये सईदने म्‍हटले " लोकांना या बाबत वेगळे कारण वाटत असेल. पण, विश्‍वास ठेवा या मागे फक्‍त जिहाद हेच कारण आहे."
> "अमेरिकेतील प्रत्‍येकी घडामोडी मागे ब्रिटेनच आहे'', असेही तो म्‍हणाला.
> ''यूएस केवळ ऑपरेटिंग हँड आहे. प्रत्‍यक्षात यूके पॉलिसी मेकर आहे. आता अल्लाह त्‍यांना त्‍यांच्‍या कर्माची शिक्षा देत आहे. ''
लंडनला वेगळे करण्‍याची मागणी
> ईयूमधून ब्रिटेन बाहेर पडला. त्‍या नंतर आता लंडनला ब्रिटनपासून वेगळे करावे, या मागणीची एक ऑनलाइन याचिका दाखल करण्‍यात आली आहे.
> त्‍यासाठी जोरदार मोहीम सुरू झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...