आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Terrorists Attack Bacha Khan University In Pakistan

#BachaKhanUniversity: या हल्ल्यामागेही \'पेशावर\'मधील \'चाइल्ड किलर\'चाच हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर (पाकिस्‍तान) - वायव्य पाकिस्तानमधील चरसड्डा जिल्‍ह्यातील बचा खान विद्यापीठात 10 दहशतवाद्यांनी हल्‍ला केला असून, यामध्‍ये तीन हजार विद्यार्थी अडकून पडलेत. दरम्‍यान, यामध्‍ये 21 जण ठार झाले असून, 50 पेक्षा अधिक गंभीर जखमी आहेत तर चार दहशतवाद्यांना कंठस्‍थान घालण्‍यात आले. या ठिकाणी अनेक स्फोटही झाले. आता हे ऑपरेशन संपले असून, दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे.
या हल्ल्यातही पेशावर हल्ल्याचा मास्टर माइंड चाइल्ड किलरचा हात...
- रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, तहरीक-ए-तालिबानच्या गीदर ग्रुपनेच हा हल्ला घडवला. हल्ल्याचा मास्टरमाइंड ग्रुपता कमांडर उमर मन्सूर आहे.
- मन्सूर डिसेंबर 2014 मध्मेंये पेशावरमध्ये आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या हल्ल्याचाही मास्टरमाइंड होता. त्यात चिमुरड्यांनी प्राण गमावले होते.
- तो टीटीपीचा म्होक्या हकीमुल्ला मसूदचा नीकटवर्तीय होता तसेच पेशावरच्या जवळ दर्रा आदम खेलचा राहणारा आहे.
- पेशावर हल्ल्यानंतर तो ‘चाइल्ड किलर’ म्हणून बदनाम झाला.
- मन्सूर एवढा क्रूर आहे की, तालिबानचे जे दहशतवादी सैनिक किंवा मुलांवर दया दाखवतात त्यांनाही तो ठार मारतो.
आतापर्यंतच्या घटना आणि कारवाई
1.तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेने या हल्‍ल्‍याची जबाबदारी घेतली.
2. हा हल्‍ला ‘सीमांत गांधी’ नावाने प्रसिद्ध असलेल्‍या भारतरत्‍न मशहूर खान अब्‍दूल गफ्फार खान यांच्‍या पुण्‍यतिथी सोहळ्यात झाला. खान यांचा भारतरत्‍न पुरस्‍काराने गौरव झालेला आहे.
3. पाकिस्तानमध्‍ये व्‍हीआयपीच्‍या सुरक्षेची जबाबदारी असलेली स्पेशल कमांडोची टीम विद्यापीठात गेली.
4. विद्यापीठ प्रशासन म्‍हणाले, 'आत किती दहशतवादी घुसले याचा नेमका आकडा सांगता येणार नाही.'
पाकिस्‍तानचे पंतप्रधान स्वित्झर्लंडमध्‍ये तर आर्मी प्रमुख सौदीत
- जिओ न्यूजचे जर्नलिस्ट सैयद तलत हुसैन यांनी ट्वीट करून माहिती दिली की, पाकिस्तान आणि खैबर प्रांताचे मुख्‍य नेते देशाबाहेर आहेत‍.
- त्‍यांनी ट्वीट केले, "पीएम शरीफ स्वित्झर्लंडमध्‍ये थंडीचा आनंद घेत आहेत तर आर्मीचे प्रमुख राहिल ईरान हे सौदी अरबमध्‍ये आहेत. एवढेच नाही तर खैबर सरकारमधील अर्ध्‍यापेक्षा अधिक महत्‍त्‍वाचे नेते एमओयू साइन करण्‍यासाठी विदेशात गेले आहेत. दुसरीकडे इकडे टेररिस्ट विद्यापीठातील विद्यार्थ्‍यांना मारत आहेत.
सैनिकांच्‍या गणवेशात आले होते दहशतवादी
- विद्यार्थ्‍यांनी सांगितले, ''दहशतवादी आमच्‍या सारखे तरुण होते. त्‍यांच्‍याकडे एके एके-47 गन होती. त्‍यांनी सैनिकांसारखे जॅकेट घातलेले होते. हल्‍ला झाला तेव्‍हा आम्‍ही हॉस्टलमध्‍ये होतो.''
- ''फायरिंगचा आवाज ऐकून आमच्‍या केमिस्ट्री लेक्चररने आम्‍हाला आत जाण्‍यास सांगितले. त्‍यांनी त्‍यांची पिस्टल काढली. पण, त्‍यांनी फायर करण्‍यापूर्वीच दहशतवाद्यांनी त्‍यांच्‍यावर गोळ्या चालवल्‍या. मी दोन लोकांना फायरिंग करताना पाहिले. नंतर मागच्‍या संरक्षण भिंतीवरून उडी मारून मी माझा जीव वाचवला'', अशी माहिती झियोलॉली स्टूडेंट जहूर अहमद याने दिली.
UPDATES...

03:00 PM : सुसाइड बेल्ट्सला डिफ्यूज करण्‍यासाठी बॉम्‍ब डिस्पोजल टीम पोहोचली.
02:58 PM : चरसद्दाचे डीएसपी रजा मोहम्मद खान यांनी सांगितले, ''चारही दहशतवादी ठार झाले असून, आत एकही दहशतवादी नाही.
02:06 PM : पंतप्रधान नवाज शरीफ यांनी तीन केंद्रीय मंत्र्यांना चरसद्दाला जाण्‍याचे आदेश दिले.
02:00 PM : मीडियाला विद्यापीठ परिसरात येण्‍याची परवानगी दिली.
01: 50 PM : कॅम्पसमध्‍ये सर्च अॅण्‍ड क्लिअर ऑपरेशन संपले.
01:42 PM : हल्‍लेखोराचे वय 18 ते 22 वर्षांपर्यंत होते.
01:40 PM : पाक मीडियाच्‍या वृत्‍तानुसार, दीड तासांपासून फायरिंग थांबलेली आहे.
01:35 PM : दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन संपले. मात्र, शोध मोहीम सुरूच.
01:30 PM : चरसद्दा जिल्‍ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना 31 जानेवारीपर्यंत सुटी
01:19 PM : खैबरचे मुख्‍यमंत्री परवेज खट्‌टक यांनी आपला यूके दौरा अर्ध्‍यावर सोडून पाकिस्‍तानकडे प्रयाण केले.
01:10 PM : चरसद्दा हॉस्पिटलमध्‍ये विद्यापीठातून 19 मृतदेह आणले गेले.
01:00 PM : खैबर प्रांताचे मंत्री शौकत यूसुफजई यांनी माहिती दिली की, या हल्‍ल्‍यात 25 लोक ठार झाले तर 50 गंभीर जखमी झाले.
12:50 PM : न्यूज चॅनलने या हल्‍ल्‍याचे लाइव्‍ह फुटेज दाखवणे बंद करावे, असा आदेश ब्रॉडकास्ट रेगुलेशन अथॉरिटी 'पेमरा'ने दिला.
12:50 PM : आर्मीने परिसरातील गावातून ऑपरेशन सुरू केले.
12:22 PM : 8 ते 10 दहशतवादी अजूनही विद्यापीठात आहेत.
12:05 PM : तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने या हल्‍ल्‍याची जबाबदारी घेतली.
11:53 AM : विद्यापीठात घुसलेल्‍या दहशतवाद्यांची संख्या 10 होती.
11:49 AM : एन्‍काउंटरमध्‍ये चार दहशतवाद्यांना कंठस्‍थान घातले.
11: 37 AM : एक प्राध्‍यापक, दोन विद्यार्थी आणि एका गार्डचा मृत्‍यू. डीआयजी यांच्‍या माहितीनुसार दोन दहशतवाद्यांना कंठस्‍थान घालण्‍यास यश
11: 30 AM : दहशतवादी एके 47 मधून फायरिंग करत आहेत.
11: 25 AM : दहशतवाद्यांच्‍या निशाण्‍यावर मुलींचे वसतीगृहसुद्धा होते. वसतीगृहाच्‍या अवतीभवतीच दहशतवादी लपून बसले आहेत.
11: 20 AM : रेस्क्यू टीमने 50 विद्यार्थ्‍यांना वाचवले.
11: 15 AM : रेस्क्यू ऑपरेशनमध्‍ये सहभागी अधिकाऱ्याच्‍या माहितीनुसार दहशतवाद्यांनी जवळपास 70 विद्यार्थ्‍यांच्‍या डोक्‍यात गोळी घातली.
11: 12 AM : पाकिस्तानी सेनेने स्पेशल कमांडोच्‍या टीमला विद्यापीठ परिसरात उतरवले.
11: 10 AM : काही पॅराट्रूपर्स कॅम्पसच्‍या छतावरून दहशतवाद्यांना प्रत्‍त्‍युतर देत आहेत.
10: 56 AM : आपला जीव वाचण्‍यासाठी शेकडो विद्यार्थी बाथरुम, टॉयलेटमध्‍ये घुसले आहेत.
10: 42 AM : हल्‍ल्‍याला उत्‍तर देण्‍यासाठी पाकिस्‍तानी आर्मीने सात 7 हेलिकॉप्टर्सची मदत घेतली आहे.
10: 32 AM : आर्मीचे एक पथक विद्यापीठामध्‍ये गेले आहेत.
10: 25 AM : तीन दहशतवादी सुसाइड बॉम्‍बर असल्‍याचे सांगितले जात आहे.
10: 15 AM : हल्‍ल्‍लेखोर विद्यापीठाच्‍या मागील फाटकातून आत घुसल्‍याचे सांगितले जात आहे.
10: 05 AM : पेशावरच्‍या हॉस्पिट्ल्समध्‍ये इमरजेंसी घोषित करण्‍यात आली.
09: 55 AM : या हल्‍ल्‍यात दोन सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाले.
09: 48 AM : फोर्सला पाचारण करण्‍यात आले असून, दोन्‍हीकडून गोळीबार सुरू आहे.
09: 48 AM : 'डॉन'च्‍या वृत्‍तानुसार, आतापर्यंत 1122 विद्यार्थ्‍यांना सुरक्षित बाहेर काढण्‍यात आले असून, पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
पुढे वाचा, विद्यापीठात एवढी मोठी गर्दी कशी ?