आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात कोर्टासमोर आत्मघाती हल्ला; १८ जणांचा मृत्यू ,६० जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर- पाकिस्तानाती लखैबर-पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी एका न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवले. त्यात किमान १८ जण मृत्युमुखी तर ६० जखमी झाले. अन्य घटनेत धुमश्चक्रीत सुरक्षा दलाने चार आत्मघाती हल्लेखाेरांचा खात्मा केला.

ही घटना मर्दान जिल्हा सत्र न्यायालय भागात घडली. शुक्रवारी सकाळी स्फोटके धारण करून आलेल्या हल्लेखाेरांनी स्वत:ला पेटवले. त्यात पहिला स्फोट झाला. त्याची तीव्रता कमी होती. त्यानंतर मोठे स्फोट झाले. घटनास्थळावरून आम्हाला १२ मृतदेह आढळून आले आहेत. मृतांत वकील, पोलिस, नागरिकांचा समावेश आहे. ६० जण जखमी झाले आहेत. त्यात वकील, पोलिस नागरिक आहेत, अशी माहिती बचाव पथकाकडून देण्यात आली. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारने सुरक्षा वाढवली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलावरील हा दुसरा हल्ला आहे. गेल्या महिन्यात बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टामध्ये असाच हल्ला झाला होता. त्यात किमान ७० जणांचा मृत्यू झाला होता.
पुढील स्लाइड्सवर वाचा, ख्रिश्चन कॉलनीवरील हल्ल्याचा प्रयत्न उधळण्यात यश
(Pls Note-तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...