पेशावर - पाकिस्तानच्या पेशावर शहरावर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी येथील ख्रिश्चन कॉलनीत सकाळी 6 वाजता गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना केलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना यम सदनी धाडले आहे. यात एकाचा मृत्यू, तर 5 जण जखमी झाले आहेत. हे सर्व आत्मघाती बॉम्बर्स होते. मोठा हल्ला टळला...
- पाकिस्तानचे इंटर-सर्व्हिस पब्लिक रिलेशनचे संचालक असीम बाजवा यांनी शुक्रवारी ट्विट करुन सांगितले, सर्व आत्मघाती बॉम्बर्स मारले गेले असून पूर्ण भागात शोध मोहिम सुरु आहे.
- ही गोळीबार ख्रिश्चन कॉलनीत झाली. हल्ला करणारे सर्व आत्मघाती बॉम्बर्स होते.
- ही कॉलीन पेशावरजवळील वारसाक गावात आहे. येथे लष्कराचे तळही आहे.
दोन दहशतवाद्यांनी स्वत:ला उडवले
- पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार, हल्ला सकाळी 6 वाजता झाला. हे हल्लेखोर हातात बंदूका घेऊन आले होते व आत्मघाती जॅकेट परिधान केले होते.
- ख्रिश्चन कॉलनीच्या गेटवर तैनात खासगी सुरक्षारक्षक व पोलीसाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तातडीने यांनी गोळीबार सुरु केला.
- या दरम्यान दोन दहशतवाद्यांनी स्वत:ला उडवून घेतले. दुसरीकडे दोघांना सुरक्षा दलांनी मारले आहे.
- पाकच्या ट्रिब्युन वेबसाइटने पोलिसांच्या माहितीच्या आधारे सांगितले, की या हल्ल्यात एक ख्रिश्चन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दोन खासगी सुरक्षारक्षक अली व नजीम जखमी झाले आहेत. दुसरीकडे एक पोलीस शिपाई सज्जाद गंभीर जखमी झाला आहे.
- पेशावर आतापर्यंत अनेक हल्ले झाले आहे. सर्वात मोठा दहशतवादी हल्ला डिसेंबर 2014 मध्ये झाला होता. यात तालिबानी दहशतवाद्यांनी एका लष्करी शाळेत केलेल्या हल्ल्यात 150 शाळकरी मुले मारली गेली होती.