आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Terrorists Take Shelter In Country Pak Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातूनच दहशतवादाला आश्रय मिळतोय पाक सरकारला साक्षात्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - दहशतवादी आणि दहशतवादाला देशातूनच आश्रय मिळत असल्याचे अखेर पाकिस्तान सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच अशा प्रकारची कृती करणा-या ४८ मदरशांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. शुक्रवारी सरकारकडून याचे स्पष्ट संकेत देण्यात आले.

सिंध राज्याचे मुख्यमंत्री कैइम अली शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ही बैठक गुरुवारी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दहशतवादाला पाठिंबा देणा-या मदरशांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे माहिती मंत्री शारजिल इनाम मेमन यांनी पत्रकारांना दिली. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणा-या प्रशिक्षण शिबिरांची विश्वसनीय माहिती आमच्या हाती लागली आहे. प्रांतात ४८ शिबिरे झाल्याचे पुरावे हाती लागले आहेत. त्यांच्याविरोधात कडक कारवाईचा मार्ग खुला झाला आहे, असा दावा मेमन यांनी केला आहे. आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करण्यासाठी विशेष दलाची स्थापना केली आहे.देशात विविध धार्मिक गट मदरसे चालवले जातात.

त्याद्वारे धार्मिक तेढ पसरवणे, दहशतवादी कृत्यास प्रोत्साहन देणे इत्यादी देशविघातक कृत्ये केली जातात, असा संशय होता. सरकारी पातळीवर त्यासंबंधी हालचाली सुरू झाल्यामुळे कृत्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.