आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे लाहोरची रिक्षावाली, एकेकाळी केला होता आत्महत्येचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानसारख्या कट्टर देशात एक महिला ऑटोरिक्षा चालवते हे बऱ्याच लोकांसाठी आश्चर्याची बाब आहे. लाहोरच्या रस्त्यांवर रेहाना बी आपला रिक्षा घेऊन निघते तेव्हा अनेक जण तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहतात. पण, आपल्या कुटुंबाचा गाडा स्वतः हाकणाऱ्या रेहानाला याची काहीच परवा नाही. तीन वर्षांपूर्वी जेव्हा पतीचे निधन झाले होते, तेव्हा आपल्या तीन मुलांना शाळेत पाठवणे तर दूर त्यांना खायला काय देणार असा प्रश्न रेहाणाला पडला होता. वेळ तर अशी आली होती, की एकेकाळी तिने आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. पण, तिच्या मुलाने आणि लोकांनी तिच्या मनात आत्मविश्वास जागृक केला आणि लढण्याची ताकद दिली असे ती मान्य करते. 

 

आत्महत्या करणार होती
> पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, लाहोरमध्ये राहणाऱ्या रेहाणाच्या पतीचे 3 वर्षांपूर्वी निधन झाले. सुरुवातीला नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण काहीच हाती लागले नाही. यानंतर तिच्या मुलाने बाइक चालवणे शिकवले. 
> आपल्याच मुला-मुलींना बाइकवर बसून शाळेत ने-आण करत असताना दुसऱ्या चिमुकल्यांनाही दररोज शाळेत सोडून ती पैसे कमवायला शिकली. मात्र, एका अपघातात तिचा पाय फ्रॅक्चर झाला. यानंतर पै-पै जोडून आपल्या बाइकला अतिरिक्त चाक जोडले. यानंतर टू-व्हीलरचे थ्रीव्हलर बनले. 
> शाळेत तिच्याबद्दल लोकांना कळाल्यानंतर शाळेने तिला 6000 रुपये (3000 भारतीय रुपये) दरमहा देण्यास सुरुवात केली. मात्र, काही दिवसांतच एवढ्याच पगारमध्ये डबल काम करण्यास दबाव टाकला. यानंतर तिने नोकरी सोडली.
> त्या वेळी रेहाणाकडे काहीच काम उरले नव्हते. आपली लेकरं उपाशी मरणार या भितीने ती डिप्रेशनमध्ये गेली. आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला.

 

सुरुवातीला महिला प्रवाशीच स्वीकारत होते...
> रेहानाने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात आपली बाइक सोडून ऑटोरिक्षा घेण्याचा संकल्प घेतला. स्थानिकांना याबद्दल माहिती मिळाळ्यानंतर अनेकांनी रेहानाची आर्थिक मदत केली. डाऊन पेमेंटची व्यवस्था झाली. यानंतर ऑटोरिक्षा शोरूमवाल्यांनी देखील खूप सहकार्य केले. त्यांनी ईएमआयवर डिस्काउंट दिला. 
> सुरुवातीला ऑटोरिक्षा घेऊन रस्त्यावर उतरली तेव्हा अनेकांनी टीका केली. सगळेच विचित्र नजरेने पाहत होते. त्यामुळे, ती पुरुष प्रवाश्यांना रिक्षात बसवतच नाही. केवळ महिला प्रवाश्यांना घेऊन ती पोट भरण्याइतकी कमाई करायची.
> लोकांचे टोमणे कमी होतील असा तिचा गैरसमजही दूर झाला. यानंतर टोमणे ऐकूण-ऐकूण ती धाडसी बनली आणि बिन्धास्त झाली. तिचे धाडस पाहूण इतर पुरुष रिक्षाचालकांनीही तिला रस्ते दाखवणे आणि गॅरेजसह अनेक प्रकारची मदत करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानात स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यास इच्छुक अशिक्षित महिलांसाठी ती एक आदर्श ठरत आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, तिचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...