आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या भारतीय व्यक्तीसमोर झुकत होता संपूर्ण पाकिस्तान, जाणून घ्या का...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क-  ‘अब्दुल सत्तार ईदी’  हे नाव संपूर्ण पाकिस्तानात खूप आदराने घेतले जाते. अब्दुल सत्तार हे नाव पाकमधील तमाम नागरिकांच्या मनावर राज्य करते. ईदी यांना कोणी ‘फरिश्ता’,  कोणी ‘फादर टेरेसा’ तर कोणी  ‘दुसरे गांधी’ म्हणतात. पाकिस्तानात त्यांच्या समाजसेवी संस्थेची इतकी प्रतिष्ठा आहे की, जर त्यांच्या संस्थेचे वाहन एखाद्या फायरिंग क्षेत्रातही पोहचले तरी गोळीबारी थांबली जाते. गुजरातमध्ये झाला होता जन्म...
 
अब्दुल सत्तार यांचा जन्म 28 फेब्रुवारी, 1928 रोजी गुजरातमधील जूनागड जिल्ह्यातील बांटवा गावात झाला तर 8 जुलै, 2016 रोजी त्यांचे कराचीत निधन झाले. अब्दुल सत्तार 1947 मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्यादरम्यान व भारत- पाकिस्तान फाळणीनंतर कुटुंबांसह पाकिस्तानात पोहचली होती. वर्ष 1951 मध्ये त्यांनी एक छोटीशी डिस्पेन्सरी खोलली. यानंतर त्यांनी आपले उत्पन्न लोकांत वाटले व गरीब लोकांची मदत करणे सुरु केले. अब्दुल सत्तार ईदी यांच्या समाजसेवेसाठी पाकिस्तान सरकारने त्यांना 16 वेळा नोबल पुरस्कारासाठी नामांकित केले होते. वर्ष 1996 मध्ये भारत सरकारने त्यांना गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केले होते. 
 
पुढे स्लाईड्द्वारे पाहा, अब्दुल सत्तार यांच्या कार्याविषयी....
बातम्या आणखी आहेत...