इंटरनॅशनल डेस्क- सीरियात अमेरिकेचे समर्थन करणा-या कुर्द आणि अरब बंडखोरांचा समूह आता रक्कावर कब्जा करण्याच्या जवळ पोहचले आहेत. रक्का सीरियातील दहशतवादी संघटना इसिसची राजधानी आहे आणि मागील काही दिवसांपासून इसिसची येथील पकड कमी कमी होत चालली आहे. सीरिया सरकारच्या बंडखोरांनी रविवारी अल-कदीसिया भागात ताबा मिळवला. हा बाग रक्कापासून जवळच आहे. सीरियन सरकारचे लष्कर सीरियन डेमोक्रेटिक फोर्सेस (एसडीएफ) नेया महिन्याच्या सुरुवातीपासूनच रक्कावर ताबा मिळविण्यासाठी आपले अभियान सुरु केले आहे. तेव्हापासून रक्कात IS दहशतवादी आणि लष्कर यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. लष्कराने ज्या भागात ताबा मिळवला आहे तेथील परिसर संपूर्णपणे उद्धवस्त झाला आहे. सीरियन आर्मीने रक्का शहराला ताब्यात गेतल्यानंतर काही फोटोज जारी केले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...