आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tow Son Of Lal Masjit Religions Guroo In Pakistan

लाल मशिदीच्या धर्मगुरूच्या दोन मुलांना पाकमध्ये अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- लाल मशिदीचे माजी धर्मगुरू अब्दुल राशिद गाझी यांच्या दोन पुत्रांना पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले. अब्दुल राशिद हे २००७ मध्ये झालेल्या लष्करी कारवाईत ठार झाले होते. पोलिस व निमलष्करी दलाने केलेल्या संयुक्त कारवाईत हारुण राशिद आणि हारिस राशिद यांना इस्लामाबादच्या एफ-६ परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अटक झाली त्या वेळी या दोघांच्या कारमध्ये लष्करी गणवेश आणि गन सापडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

अब्दुल राशिद गाझी यांच्या मृत्यूस माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ जबाबदार असल्याचा आरोप आहे. गाझींच्या मुलांवर यामुळेच पोलिसी कारवाई झाल्याचा आरोप लाल मशिदीच्या सूत्रांनी केला. हारुण यांनी वर्ष २०१३ मध्ये आपल्या पित्याच्या मारेकऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. लाल मशिदीवर २००७ मध्ये धडक कारवाई झाली होती.