आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात असेही एक गाव, जेथे एके-47 मिळते केवळ 7700 रुपयांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'अदम खेल\' गाव. (फाईल फोटो) - Divya Marathi
\'अदम खेल\' गाव. (फाईल फोटो)
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्याच्याविरोधात कारवाई करताना ओरकजई कबायली एजन्सीच्या कलाया आणि कुर्रम कबायली भागात रॉकेट, आयईडीएस, स्फोटके, ग्रेनेड, मोर्टार बॉम्बसह विविध प्रकारच्या हत्यारे आणि उपकरणे जप्त केली आहेत. आर्मीला मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व हत्यारे पाकिस्तानातील दारा अदम क्रीडाग्राममध्ये बनली आहेत. पाकिस्तानच्या फेडरल अॅडमिनिस्ट्रेशन ट्रिबल एरियाज (फाटा) च्या रिपोर्ट्सनुसार, खैबर पखतून्ख्वा प्रांतात 'अदम खेल' गावात हत्यारांसाठी कुख्यात आहेत. येथे एके-47 केवळ 95 पाउंड (सुमारे 7700 रुपये)मध्ये मिळते. अॅंटी-एयरक्राफ्टपासून पेन गनपर्यंत...
 
- येथे हत्यारे बनविणारे एवढे चलाख आहेत की अॅंटी-एयरक्राफ्टपासून ते पेन गनपर्यंत बनवतात.  
- हत्यारे विकणा-याचे म्हणणे आहे की, जगात बनणारे असे एकही हत्यार नाही जे आम्ही बनवू शकत नाही.  
- सांगितले जाते की, येथे तुम्हाला केवळ १० दिवसात हवे ते हत्यार उपलब्ध करून दिले जाते. 
- एकदा या शस्त्राची पहिली कॉपी बनवली गेली की दुसरी केवळ 2-3 दिवसात बनवतात. 
- त्याचे टूल्स भले ही खूपच जुने असेल पण त्यातून बनणारे हत्यार एकदम टकाटक असते. 
- ओरिजनल हत्याराचा सीरियल नंबर यात एकदम चलाखीने टाकतात. 
- गावात अजूनही पाक सरकारचा कायदा लागू होत नाही. तेते आजही कबीलियन कायदा चालतो.
 
हत्यार चालण्याची गॅरंटी नाही-
 
- मात्र, ही हत्यारे ओरिजनल हत्यारासारखी चालतील की नाही याची मात्र कोणतेही गॅरंटी नाही. 
- हाताने नॉर्मल स्टीलने बनवलेली गन कंप्यूटराइज्ड मशीनद्वारे कंपनीत बनवलेल्या गनशी मॅच होत नाही. 
- या हत्यारात काही दुरूस्ती असेल तर त्याचे पार्ट्स बदलून दिले जात नाहीत. ही हत्यारे खराब झाल्यास दुरुस्त होत नाहीत ती थेट फेकून द्यावी लागतात.  
- हा बेकायदेशीर धंदा नेमकी कधी सुरु झाला याची कोणालाही माहिती नाही.
- मात्र बोलले जाते याची सुरुवात 1857 मध्ये बंडखोरांनी ब्रिटिश आर्मीविरूद्ध केली होती. 
- या हत्याराची मागणी तेव्हा वाढली जेव्हा 1979 मध्ये रशियाने अफगाणिस्तानवर हल्ला केला होता.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 'अदम खेल' गावशी संबंधित इंटरेस्टिंग FACTS...
बातम्या आणखी आहेत...