आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twin Attack In Lahore Churches, 5 Dead 25 Injured

पाकिस्तान : योहानाबादमधील बॉम्ब हल्ल्यात 14 ठार, जमावाने पोलिसांना बनवले बंधक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोरः पाकिस्तानमधील लाहोर शहराच्या योहानाबादमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 12 वर्षाच्या मुलासमवेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात जवळपास 68 लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयीताला अटक केली आहे. या बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान (पाकिस्तान)पासून वेगळे झालेली दहशतवादी संघटना जमात-उल-अहरारने घेतली आहे. तर दुसरीकडे या हल्ल्याने नाराज झालेल्या जमावाने तीन पोलिसांनाच बंधक बनवले आहे. या तिघांवर सुरक्षेसाठी तैनात असताना ते क्रीकेट मॅच पाहात होते असा आरोप या पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. जमावाला पसरवण्यासाठी पोलिसांनी हवेत फायरींग केली.
फोटो - जखमींना न्यायालयात घेऊन जाताना पोलिस अधिकारी.

घटनास्थाळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोन हल्लेखोरांनी घडवून आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणले. योहानाबाद येथे पाकिस्तानातील सर्वाधिक ख्रिश्चन धर्मीय राहतात. दहशतवादी गेल्या अनेक दिवसांपासून ख्रिश्चन धर्मियांना लक्ष्य करत आहेत.

2013 मध्ये पेशावर येथील चर्चामध्ये झालेल्या अशाच दुहेरी स्फोटात सुमारे 80 जणांचा मृत्यू झाला होता. तर शंभरावर नागरीक यात जखमी झाले होते. टीटीपी म्हणझे तहरीक ए तालिबान पाकिस्तानच्या जमातुल अहरूर गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTO...