आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UN Had Declared Jamaat Ud Dawa (JuD) A Terrorist Organization

हाफिज सईदच्या \'जमात-उद-दावा\'च्या कव्हरेजवर बंदी, USने उपटले होते कान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड व कुख्यात दहशतवादी हाफिज सईदची संघटना 'जमात-उद-दावा'च्या वृत्तांकनावर (मीडिया कव्हरेज) पाकिस्तान सरकारने बंदी घातली आहे.

हाफिज सईदची संघटना 'जमात- उद- दावा'सह 'फलह-ए-इंसानियत' (FIF), 'लश्कर-ए-तोयबा' (LeT) वरही गृहमंत्रालयाने बंदी घातली आहे. या सर्व दहशत‍वादी संघटनांवर पाकिस्तान नॅशनल एक्शन प्लॅननुसार (NAP) कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला होता. दौर्‍यादरम्यान दहशतवाद्याच्या मुद्यावरून अमेरिकेने पा‍किस्तानचे चांगलेच कान उपटले होते.

कोण आहे हाफिज सईद?
> हाफिज सईद हा मुंबईतील सगळ्यात मोठा 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.
> 2008 मध्ये सईदला संयुक्त राष्‍ट्राने (यूएन) दहशतवादी घोषित केले होते.
> यूनाइटेड नेशन्सने हाफिजच्या 'जमात उद दावा' या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.
> अमेरिकेने हाफिज सईदवर 10 मिलियनचे बक्षिस ठेवले आहे.

हाफिजच मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड
26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईत पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी हल्ला केला होता. या हल्लात विदेशी पर्यटकांसह 166 लोकांचा मृत्यु झाला होता. 'लश्कर'चा कमांडर जकी-उर-रेहमान लखवी व सईद हाफिज या दोघांनी दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले होते.

का झाली कारवाई?
> यूएन सेक्युरिटी काउन्सिल रेग्यूलेशन व इंटरनॅशनल प्रेशरमुळे पाकिस्तान सरकारने ही कारवाई केली आहे.
> पाकिस्तानी इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्यूलेटरी असोसिएशनने (PEMRA) या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे.

काय आहे पाकिस्तानचा नॅशनल एक्शन प्लॅन?
> पाकिस्तान सरकारने जानेवारीमध्ये नॅशनल एक्शन प्लॅन सुरु केला होता.
> पेशावरमधील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 150 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने दहशतवादाविरोधात हे पाऊल उचलले आहे.
> पेशावर अटॅकनंतर पाक सरकार व मिलिट्रीने काबिलीयन व दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हल्ले केले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, हाफिज सईद, तोयबावर कारवाईची पाकची हमी