आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमध्ये झरदारींविरोधात नाराजी; पीपीपीत फूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानात दोन पंतप्रधान आणि एक राष्ट्राध्यक्ष देणाऱ्या पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये फूट पडली आहे. पार्टीचे सहअध्यक्ष अासिफ अली झरदारी यांच्यावर नाराज असलेल्या नेत्यांनी मूळ पक्षापासून वेगळे होऊन पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर्स नावाने नवीन पक्षाची स्थापना केली आहे.

वास्तविक, पाकिस्तान पीपल्स पार्टीची स्थापना दिवंगत पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांनी १९६७ मध्ये केली होती. नवीन पक्षाचे नाव पाकिस्तान पीपल्स पार्टी (वर्कर्स) असे ठेवण्यात आले आहे. नवीन पक्षाचे अध्यक्ष सफदर अब्बासी आहेत. त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षातील असंतोष आणि २०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील पराभवासाठी झरदारी यांना जबाबदार ठरवले आहे. त्यांनी पीपीपीच्या विद्यमान नेतृत्वावर पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपेक्षा केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यासोबतच बेनझीर भुत्तो यांच्या हत्येनंतर इतर पक्षांत गेलेल्या लोकांनी नवीन पक्षात सामील व्हावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पती अासिफ अली झरदारी यांनी ज्यांना दूर केले होते, ते निष्ठावंत नवीन झेंड्याखाली एकत्र आले आहेत.