आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी अॅक्ट्रेस किस्मत बेगची हत्या, कार थांबवून झाडल्या 8 गोळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानची प्रसिद्ध स्टेज अॅक्टर किस्मत बेग - Divya Marathi
पाकिस्तानची प्रसिद्ध स्टेज अॅक्टर किस्मत बेग
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानची प्रसिद्ध स्टेज अॅक्टर किस्मत बेग हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी प्रथम तिची कार थांबवली व त्यानंतर तिच्यावर गोळ्या झाडल्या. किस्मतवर एकून 8 गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीररित्या जखमी झालेल्या किस्मत बेगला लाहोरमधील सर्व्हिस रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे तिचा मृत्यू झाला. या घटनेत तिच्या कारचा ड्रायव्हर आणि पीए सुद्धा जखमी झाला आहे. एकापाठोपाठ एक अशा 8 गोळ्या झाडल्या....
- पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, किस्मतच्या हत्येमागे वैयक्तिक कारण असण्याची शक्यता आहे.
- पोलिस अधिका-यांनी सांगितले की, यापूर्वी याच हल्लेखोरांनी किस्मत बेगवर दोन गोळ्या झाडल्या होत्या.
- त्यामुळे या हत्येमागे वैयक्तिक कारण असले तरी हत्येचे षडयंत्र रचणा-यांना सोडले जाणार नाही.
- याआधी पाकिस्तानी मॉडेल आणि टीव्ही अॅक्ट्रेस कंदील बलोचची हत्या करण्यात आली होती.
- कंदील बलोचच्या हत्येचा आरोप तिच्यावर भावावर आहे. पोलिसांनी कंदीलची हत्या म्हणजे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे म्हटले होते.
- त्याआधी पाकिस्तानी कव्वाल अमजद साबरींना कराचीत गोळ्या घालून मारले होते.
- तर, पकिस्तानी अॅक्टर आणि टेलीविजन प्रेजेंटर नदीम जाफरीला त्याच्या घराबाहेरच लुटारूंनी लुटत गोळ्या झाडून जखमी केले होते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, किस्मत बेगचे PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...