आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK वर नजर ठेवून आमची मदत करू शकतो भारत, UN मध्ये अमेरिकन राजदूतांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंगटन - आपला शेजारील राष्ट्र पाकिस्तानवर नजर ठेवून भारत आमची मदत करू शकतो असे संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत निकी हेली यांनी सांगितले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर यूएनमध्ये अमेरिकन राजदूतांची ही प्रतिक्रिया समोर आली. 
 

भारतासोबत धोरणात्मक पार्टनरशिप आवश्यक...
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी नुकतेच अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियात दहशतवाद विरोधात युद्धाची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर भारत अमेरिकेचा धोरणात्मक पार्टनर होऊ शकतो असे यूएनमध्ये अमेरिकेच्या राजदूत निकी हेली म्हणाल्या आहेत. 
- अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियात दहशतवाद्यांची ठिकाणे अमेरिकेसाठी अतिशय चिंताजनक आहेत. त्यांच्या हातात (पाकिस्तानचे) अण्वस्त्र लागू नये यासाठी धोरणात्मक आणि लष्करी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतासोबत आर्थिक आणि संरक्षण सहकार्य वाढवले जातील असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत. 
- पाकिस्तान कित्येक वर्षांपासून आमचा सहकारी असल्याबद्दल आम्ही त्याचा सन्मान करतो. मात्र, पाकिस्तान किंवा इतर कुठल्याही देशाने दहशतवाद्यांना संरक्षण दिल्यास अमेरिका ते खपवून घेणार नाही. 
- अफगाणिस्तानच्या विकासात भारताने मदत करावी. तेथे भारताने राजकीय स्थैर्य आणण्यासाठी मदत केलीच आहे. यासोबतच तो अफगाणिस्तानचा शेजारी असल्याने भारताची मदत आवश्यक आहे असेही अमेरिकेने सांगितले आहे. 
बातम्या आणखी आहेत...