आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला दहशतवाद पुरस्कृत देश घोषित करण्याची हीच योग्य वेळ - माजी अमेरिकन अधिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात नजरकैदेत असलेला 26/11 हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद... - Divya Marathi
पाकिस्तानात नजरकैदेत असलेला 26/11 हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद...
इंटरनॅशनल डेस्क - ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानसह कतार आणि तुर्कीला दहशतवाद पुरस्कृत राष्ट्र म्हणून घोषित करण्याची योग्य वेळ आली आहे. अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयातील (पेंटागन) माजी अधिकाऱ्याने असे म्हटले आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणारे आणि त्यांना खतपाणी घालणाऱ्या देशांना दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत टाकण्याची हीच खरी वेळ आहे. 
 
 
- पेंटागनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी वॉशिंगटन एक्जॅमिनरला दिलेल्या एका लेखात आपले विचार मांडले आहेत. ते सध्या अमेरिकन एंटरप्राइस इंस्टिट्युटमध्ये रेसिडेंट स्कॉलर आहेत. 
- त्यांनी लिहिल्याप्रमाणे, "पाकिस्तानला जबाबदार ठरवण्याची हीच खरी वेळ आहे. निर्बंधांपासून वाचण्यासाठी पाकिस्तानला आपल्या देशातील दहशतवाद्यांना तुरुंगात डांबावे लागेल. त्यांना शस्त्र आणि वित्त पुरवठा बंद करायला हवा."
- कोणता देश अमेरिकेची मदत करतो, किंवा कोणता देश अमेरिकेचा मित्र आहे याचा विचार न करता दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांना दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत टाकावे असेही ते पुढे म्हणले आहेत.
- 1979 पासून भारतीय परराष्ट्र मंत्रालयाप्रमाणेच अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय सुद्धा दहशतवाद पुरस्कृत देशांची यादी अपडेट करत असतो. यात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि सरकारी आश्रय देणाऱ्या देशांना टाकले जाते. तसेच त्यांच्यावर विविध प्रकारचे निर्बंध देखील लावले जातात. 
 

दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत 8 राष्ट्र
अमेरिकेने अशा प्रकारच्या यादीत लीबिया, इराक, दक्षिण येमेन, सीरिया, क्यूबा, इराण, सुदान आणि उत्तर कोरियाला समाविष्ट केले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे देश दहशतवाद्यांना मदत करतात असे आरोप आहेत. गेल्या काही वर्षांत त्यामध्ये विविध प्रकारच्या सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे, आता यादीत केवळ इराण, सीरिया आणि सुदान या देशांची नावे आहेत. 
बातम्या आणखी आहेत...