आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

26/11 चा मास्टरमाइंड हाफिज सईदला अटक करा, अन्यथा गंभीर परिणाम भाेगा! अमेरिकेचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेने पाकला द्विपक्षीय संबंध बिघडतील असा इशाराही दिला. - Divya Marathi
अमेरिकेने पाकला द्विपक्षीय संबंध बिघडतील असा इशाराही दिला.

वॉशिंग्टन- मुंबईवर २६/११ अर्थात २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्याविरुद्ध भारताने पुरावे देऊनही पाकिस्तानी न्यायालयाने त्याची मुक्तता केली आहे. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून पाकला इशारा दिला आहे. सईदच्या सुटकेचा निषेध करून त्याला पुन्हा अटक करावी, अशी अमेरिकेची मागणी असल्याचे ट्रम्प यांच्या माध्यम विभागाच्या सचिव सारा सँडर्स यांनी सांगितले. सईदच्या मुसक्या आवळून त्याच्याविरुद्ध नव्याने खटला चालवला नाही तर पाकिस्तानला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

 

 

हीच योग्य संधी
सईदला कोर्टाने सोडले असले तरी त्याला पकडून पाक सरकारची दहशतवादाविरुद्ध भूमिका किती कठोर आहे हे दाखवून देण्याची पाकिस्तानला हीच खरी संधी आहे, असे सारा सँडर्स यांनी नमूद केले.


२००८ मध्ये ठराव
हाफिज सईद जागतिक दहशतवादी अाहे. त्यावर आंतरराष्ट्रीय सहमती आहे. डिसेंबर २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत याबाबतचा ठराव पारित करण्यात आला होता.

 

पाक सरकारने जामिनाला विरोध केला नाही
लष्कर-ए-तोयबा उभारून दहशतवाद्यांना भारताविरुद्ध भडकावणारा हाफिज सईद याची गेल्या आठवड्यात पाकिस्तानी न्यायालयाने सुटका केली होती. न्यायालयात त्याच्याविरुद्ध खटला सुरू असताना गेल्या जानेवारीपासून स्थानबद्ध असलेल्या हाफिजच्या जामिनाला पाकिस्तानी सरकारने विरोध केला नाही.

 

१६६ जणांचे बळी

२००८ मधील मुंबईवर झालेल्या हल्ल्यात आपला हात नसल्याचा सईदने दावा कायम ठेवला आहे. २६/११ रोजी दहा सशस्त्र हल्लेखोरांनी मुंबईवर हा हल्ला केला होता. त्यात १६६ निष्पाप नागरिकांचे प्राण गेले. हल्ल्याच्या कटात सईदचा हात होता याचे पुरावे भारताने सादर केले होते. 

 

.. तर द्विपक्षीय संबंध बिघडतील 
हाफिज सईदला तत्काळ अटक करा, अन्यथा द्विपक्षीय संबंध तुटतील, अशी कठाेर भाषा अमेरिकेने ट्रम्प यांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच केली आहे.

 

अतिरेक्यांना माहिती आहे, दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त ते वाचू शकणार नाहीत : जेटली
जम्मू-काश्मीरमध्ये आता सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्या टोळ्या कमी झाल्या आहेत. जो कुणी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर होतो त्यालाही चांगले माहिती आहे की तो दोन-तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ वाचू शकणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मन की बात, चाय के साथ’ कार्यक्रमात ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...