आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Viral Video: Pakistani Model Qandeel Baloch Threats Narendra Modi

पाकिस्तानी मॉडेलने मोदींना दिली होती धमकी, मायदेशातच उडवली जाते खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानी मॉडल कंदील बलोचचा सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. - Divya Marathi
पाकिस्तानी मॉडल कंदील बलोचचा सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते.
चार दिवसांपूर्वी फेसबुकवर एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात पंतप्रधान मोदी यांना डार्लिंग आणि चहावाला असे संबोधून खिल्ली उडवण्‍यात आली होती. माणूस व्हा, अशी सूचना मोदींना केली असून पाहूण घेण्‍याची धमकी व्हिडिओत दिली आहे. या व्हिडिओचा आणि तरुणीचा सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
कोण आहे ही तरुणी...
- धमकी देणारी तरुणी कंदील बलोच एक मॉडल आणि टीव्ही कलाकार आहे. तिला सोशल मीडियाची ड्रामा क्विन असे म्हटले जाते.
- सर्वप्रथम ती 2013 मध्‍ये पाकिस्तान आयडल या कार्यक्रमाच्या ऑडिशनमध्‍ये दिसली होती. तिचे वाईट गायन ऐकून तिला ऑडिशनच्या बाहेर काढले गेले होते.
- बाहेर काढल्यानंतर बलोचने कॅमे-यासमोर बरेच नाटक केले. तिने परीक्षकांवर संताप व्यक्त केला होता.
- कॅपिटल टीव्हीच्या मॉर्निंग शोमधील तिच्या भूमिकेची पाकिस्तानमध्‍ये खिल्ली उडवली जाते. तिचे डायलॉग डबमॅशवर प्रचंड लोकप्रिय आहेत.
व्ह‍िडिओत कंदील बलोच काय म्हणते?
- मोदीजी तुमचा चहाचा व्यवसाय कसा सुरु आहे? रेल्वे स्टेशनवरील चहाचे दुकान चांगले चालत असेल अशी मला आशा आहे.
- क्षमा करा! मी नरेंद्र मोदींविषयी बोलत आहे, भारताचे पंतप्रधान. मोदीजी चहावाला... मोदीजी तुमच्यासाठी माझ्याकडे एक संदेश आहे.
- पाहा,आम्ही पाकिस्तानी प्रेमळ स्वभावाचे आहोत. आम्ही तिरस्काराकडे दुर्लक्ष करतो. तर डार्लिंग मला म्हणायचे होते, की माणूस व्हा आणि आम्हाला क्रोधित करु नका.
- मी म्हणते, ज्या दिवशी आम्हाला राग येईल त्या दिवशी कोणीही वाचणार नाही. याची नोंद घ्‍या आणि आम्हाला घाबरा.
- तर चला, आता तुम्ही चहा घ्‍या आणि लोकांनाही द्या.
पुढील स्लाइड्सवर पाहा कंदील बलोचचा व्हिडिओ आणि काही छायाचित्रे...