आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुशर्रफ यांच्याविरोधात वॉरंट, लाल मशिदीचे इमाम अब्दुल रशीद गाजी यांच्या हत्येचे प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात लाल मशिदीचे इमाम यांच्या हत्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. इस्लामाबादच्या न्यायालयाने मुशर्रफ यांना १६ मार्चपर्यंत हजर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.

लाल मशिदीत २००७ मध्ये लष्कराने कारवाई केली होती. इमाम अब्दुल रशीद गाजी यांचा त्यात मृत्यू झाला होता. गाजी यांच्या कुटुंबीयांनी २०१३ मध्ये मुशर्रफ यांच्या विरोधात हत्येचा खटला दाखल केला होता. मुशर्रफ यांच्या आदेशावरूनच लाल मशिदीवर हल्ला झाला होता असा ठपका कुटुंबीयांकडून करण्यात आला. त्या वेळी मुशर्रफ यांच्याकडे लष्करप्रमुपद होते. ही कारवाई तीन दिवस चालली. त्यात विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकांसह ७५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयाने मुशर्रफ यांची अन्य एका हत्येच्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. २००६ मध्ये बलुच नेते नवाब अकबर बुग्ती यांची हत्या झाली होती. त्यांच्या हत्येमागे मुशर्रफ यांचा हात असल्याचा ठपका होता. मुशर्रफ १९९९ मध्ये पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सत्तेवरून हटवण्यासाठी रक्तरंजित आंदोलन करून ते सत्तेवर आले होते.

त्यांनी २००८मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन निवडणूक घेतली होती. त्यानंतर ते दुबईला गेले होते. २०१३ मध्ये ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी मायदेशी परतले होते. त्यांनी राजकीय पक्षाचीदेखील स्थापना केली होती.