आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला शेजाऱ्यांशी शांतता-सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- भारत -पाक संबंधाला एक वेगळेच वळण देत कोलांटी उडी मारत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारी एका उच्चस्तरीय बैठकीत सध्याच्या भारत -पाक संबंधांचा आढावा घेताना आम्हाला शेजाऱ्यांशी शांतता-सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत, असे विधान केले.
     
शरीफ पुढे म्हणाले की, पाकिस्तान प्रदेशातील शेजारी व सर्वच देशांशी शांततापूर्ण सहसंबंधांवर विश्वास ठेवतो आणि त्यांच्याशी परस्पर सामंजस्य आणि विकास फायदेशीर मजबूत व्यापार संबंधांवर भर देतो. या विशेष उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन त्यांच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी केले होते, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
  
शांततापूर्ण संबंध परस्परांचा आदर आणि आर्थिकदृष्ट्या एकात्मिक विभागीय सहकार्य हे आमचे प्रथम प्राधान्य वा उद्दिष्ट आहे आणि आपण ते अमलात आणले पाहिजे आणि हे सहज शक्य आहे. आपण फक्त त्याविषयी बोलतो, कमिट करतो, आपल्या इच्छा व्यक्त करतो. शांतता, प्रगती आणि समृद्धी हेच आमचे व आपले उद्दिष्ट असायला हवे. चीन- पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर हा उपखंडातील कनेक्टिव्हिटीतील एक कोपऱ्याचा दगड होता आणि यामुळे आम्ही समृद्धी साधली, असेही ते या बैठकीत बोलले. त्यांनी या वेळी शेजारील राष्ट्रांचा द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संबंधांचाही आढावा घेतला.  
  
सीमेवरी भारतीय चौक्यांवर हल्ले-गोळीबार सुरू असताना अचानक भारतप्रेमाचे, सहकार्याचे, नाटकाचे असे दुतोंडी विधान पाक पंतप्रधानांकडून आल्याने त्याची चर्चा होत आहे. या वेळी पाकचे अर्थमंत्री इशाक दार, अंतर्गत मंत्री निस्सार अली खान, लष्करप्रमुख उमर जावेद बाजवा, आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जन. नाविद मुख्तार, परराष्ट्र सल्लागार सरताझ अझिज, पंतप्रधानांचे विशेष सहायक तारीक फातेमी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जन. (आर) नासीर खान जांजुआ आणि वरिष्ठ अधिकारी या उच्चस्तरीय बैठकीला उपस्थित होते.  
बातम्या आणखी आहेत...