आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही शस्त्रास्त्रे आहेत उत्तर कोरियाच्या ताफ्यात, 20 अणुबॉम्बचाही समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्मक छायाचित्र
इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरियाकडून सतत केलेल्या अणुचाचण्या न थांबवल्यास अमेरिकेचे पुढचे लक्ष्य उत्तर कोरिया असेल असे आंतरराष्ट्रीय अभ्यासकाच्या तज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वीही भारताने कोरियन द्विपकल्पावर शांतता राखण्‍याचे आवाहन उत्तर कोरियाला केले होते. तसेच अणुकार्यक्रम बंद करावे असे भारताने सांगितले होते. मात्र, उत्तर कोरियाने हे साफ धुडकावून लावले आहे. उत्तर कोरियाकडून पाकिस्तानला अण्वस्त्रे मिळण्‍याची शक्यता असल्याने भारताला कायम चिंता सतावते. अण्वस्त्र मिसाईल्सच्या चाचण्‍यांमुळे पाश्‍चात्त्य देशांनी कोरियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
 
उत्तर कोरियाचे काय आहे लक्ष्‍य-
 
द इन्स्टीट्यूट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सेक्युरिटी या संस्थेच्या माहितीनुसार 2013 पर्यंत उत्तर कोरियाजवळ प्लुटोनियम आणि युरेनियमा व्यतिरिक्त 12 ते 27 अणु शस्त्रास्त्रे होती.  2016 पर्यंत त्याची संख्या 50 च्या घरात नेल्याचे बोलले जाते. याबाबत अधिकृत काहीही माहिती उपलब्ध नाही. पण दुसरीकडे फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या अंदाजानुसार उत्तर कोरियाकडे किमान 20 अण्शस्त्रे असल्याचे म्हटले होते. 
 
पुढे वाचा, जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे उत्तर कोरिया...
बातम्या आणखी आहेत...