आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसविरोधात संपूर्ण जग एकवटण्याच्या स्थितीत, पाकिस्तानचा पळपुटेपणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - इस्लामिक स्टेट अर्थात आयएसआयएस या क्रूर दहशतवादी संघटनेविरोधात लढण्यासाठी संपूर्ण जग एकवटण्याच्या स्थितीत असतानाच दहशतवादाचे मूळ मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानने मात्र पळपुटेपणाचे धोरण अवलंबले आहे. आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील कोणत्याही प्रकारच्या अभियानासाठी जवान पाठवले जाणार नाहीत, असे पाकिस्तानच्या लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयएसआयएसचा खात्मा करण्यासाठी जागतिक युद्धनीती अवलंबण्यासाठी अमेरिकेकडून पाकवर दबाव टाकला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय त्यांची मनोधारणा स्पष्ट करणारा मानला जातोय. पाक लष्कराचे प्रवक्ता लेफ्टनंट जनरल आसिम सलीम बाजवा यांनी याबाबत सांगितले की, आम्ही यापूर्वीच अफगाणिस्तानच्या सीमेवर १ लाख ८२ हजार जवान तैनात केलेले आहेत. त्यामुळे आता आमच्या कार्यक्षेत्राबाहेर कोणत्याही प्रकारच्या अभियानात सामील होण्याचा आमचा विचार नाही. आयएसआयएस ही संघटना जगभरासाठी धोक्याची आहे आणि त्याचे मुख्य केंद्र पश्चिम आशिया आहे, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, पॅरिसमध्ये इसिसने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्ससह रशिया, अमेरिका, इंग्लंडसह अन्य राष्ट्र संयुक्त लष्करी अभियान राबवण्यासाठी एकजूट होत आहेत. अासियान शिखर परिषदेतही याबाबत विविध राष्ट्रांच्या प्रमुखांदरम्यान एकवाक्यता दिसून आली. पाकिस्तानची सध्या जगभरात दहशतवाद निर्मिती करणारे राष्ट्र म्हणून ओळख आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, यापूर्वीही साथ दिली नाही..