आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक बँकेचा पाकला १० कोटी डॉलर्स कर्जास नकार, नैसर्गिक वायू प्रकल्पाच्या कामात अपेक्षित प्रगती साधण्यात अपयश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - नैसर्गिक वायू प्रकल्पाच्या कामात अपेक्षित प्रगती साध्य करता आलेली नसल्यामुळे जागतिक बँकेने पाकिस्तानचे कर्ज नाकारले आहे. पाकिस्तानने १० कोटी डॉलर्सची मागणी केली होती. सुइ साउदर्न गॅस कंपनीच्या वतीने (एसएसजीसी) कराची, सिंध, बलुचिस्तान भागात वितरण केले जाते. परंतु कंपनीने वितरणाचे मोठे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात मोठ्या प्रमाणात अवैध गॅस जोडणीसारख्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी ठरू शकलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड बँकेने पाकिस्तानच्या प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेत कर्ज नाकारले आहे.

कापसाच्या आयातीवरील बंदी अखेर घेतली मागे
पाकिस्तानने गेल्या काही दिवसांपासून भारतातून आयात केल्या जाणाऱ्या कापसावरील बंदी काही अंशी मागे घेतली. १० हजारांवरील कापसाच्या गाठी नाकारणाऱ्या पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी विशिष्ट कापसाच्या आयातीला परवानगी देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानात कपाशीच्या एकूण उत्पादनात २७ टक्क्यांची घट झाली होती. दुसरीकडे यंदा पंजाबमधील अनेक जिनिंग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक कारखानेही बंद पडले आहेत. उद्योगांना वीज तुटवड्याची समस्या भेडसावत आहे.
बातम्या आणखी आहेत...