आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zaki Ur Rehman Lakhavi Gets Permission To Skip Hearing

२६/११ मुंबई हल्ला प्रकरण : लखवीला न्यायालयात गैरहजर राहण्याची मुभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - २००८ च्या मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकी-उर-रहमान लखवीला पाकिस्तान दहशतवादविरोधी लवाद न्यायालयासमोर उपस्थित न राहण्याची मुभा देण्यात आली. लखवीच्या जीविताला धोका असल्याचे कारण समोर करून त्याला यापुढील सुनावणीस प्रत्यक्ष उपस्थितीची गरज नसल्याचा निर्णय न्यायालयाने दिला. लखवीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

इस्लामाबाद पोलिस महानिरीक्षकांनी लखवीच्या जीविताला धोका असल्याचा अहवाल दिला होता. त्याआधारे लखवीने न्यायालयाकडे सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा मागितली होती. लखवीच्या अर्जाला इस्लामाबाद दहशतवादविरोधी न्यायालयाने मंजुरी दिली. परदेशी गुप्तहेर संस्था आणि तालिबान्यांकडून लखवीच्या जीविताला धोका असल्याचे या अर्जात म्हटले आहे. न्यायालयाचा मार्गही त्याच्यासाठी असुरक्षित असल्याचे अब्बासीने म्हटले आहे. फेब्रुवारी २००९ मध्ये २६/११ मुंबई हल्ला प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली होती.

सुनावणी गुरुवारी
बुधवारी न्यायालयाने दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवली. पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. १० एप्रिल रोजी लखवीची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. यापूर्वीही त्याने न्यायालयात उपस्थित राहण्याचे टाळले होते. मुंबई हल्ला प्रकरण २ महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने एप्रिलमध्ये संबंधित न्यायालयाला दिले आहेत. मात्र मुदत उलटून गेल्यावरही अद्याप कोणताही निर्णय होऊ शकला नाही. लखवीच्या निवासाविषयी गुप्तता राखण्यात आली .