आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचाराच्या आरोपातून झरदारी यांची मुक्तता, पाकिस्तानच्या माजी राष्ट्राध्यक्षंावर सुरू होते अनेक खटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांची १९ वर्षांपूर्वीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून पुराव्याअभावी मुक्तता झाली आहे. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. शनिवारी त्यांच्यावरील बेकायदा संपत्ती जमवल्याचा ठपका असलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. 
 
झरदारी यांचे वकील फारूक नाईक यांनी झरदारींची सुटका करण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. ६२ वर्षीय झरदारी यांच्याविरोधात कोर्टात दाखल करण्यात आलेल्या फोटोकॉपींना न्यायालयाने स्वीकारले नाही. हे प्रकरण जुने असल्याने आम्हाला काहीही लक्षात नसल्याचे बहुतेक साक्षीदारांनी सांगितले. काहींनी सांगितलेली माहिती अर्धवट आहे. ४० साक्षीदार तपासण्यात आले. परंतु एकानेही त्यांच्यावर थेट आरोप केला नाही. अखेर न्यायाधीशांनी हा खटला रद्द केला. शनिवारी हा खटला रद्द करण्यात आला. हे प्रकरण १९९९ मध्ये रद्दबातल ठरले होते. परंतु २००७ मध्ये पुन्हा या प्रकरणासह  झरदारींच्या विरोधात अन्य पाच खटले दाखल केले होते. २००९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात पुन्हा खटला सुरू केला, मात्र ते अध्यक्षपदी असल्याने हा खटला मागे पडला. २०१५ मध्ये हा खटला पुन्हा सुरू झाला. चार साखर कारखान्यांची मालकी व  पाकिस्तान आणि परदेशात झरदारी यांची बेकायदा संपत्ती असल्याचा ठपका होता. तो सिद्ध होऊ शकला नाही.  

भ्रष्टाचाराचे सहा आरोप  
झरदारी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे सहा आरोप होते. त्या सर्व आरोपातून झरदारी यांची मुक्तता करण्यात आली आहे. त्यावर झरदारी यांची मुलगी बख्तवारने ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला. अखेर खटल्याचा निकाल वडिलांच्या बाजूने लागला. हा खटला शेवटचा होता, असे तिने म्हटले आहे. इम्रान खान व नवाझ शरीफ यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले.  

राजकीय सूड  
नवाझ शरीफ यांच्या कार्यकाळात झरदारी यांच्यावर सहा, तर परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात त्यांच्याविरोधात दोन खटले दाखल करण्यात आले होते. त्यातून राजकीय सूडभावना स्पष्ट झाली. वास्तविक नॅबचे तपास अधिकाऱ्यांनी झरदारी यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे कबूल केले. झरदारी यांच्या विरोधात साखर कारखान्यात शेअर असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात त्याचेही पुरावे सापडले नाहीत, असे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.  
बातम्या आणखी आहेत...