आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Florida Jury Has Slammed A Tobacco Company, News In Marathi

सिगारेटमुळे पती गमावला; टोबॅको कंपनीतर्फे ‍मिळाली 1.42 लाख कोटींची भरपाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी- सिगारेट ओढण्याच्या व्यसनामुळे दगावलेल्या व्यक्तीच्या पत्नीला 23 अब्ज डॉलर्सचा (1 लाख 42,261 कोटी रुपये) मोबदला देण्याचे आदेश अमेरिकेच्या फ्लोरिडातील न्यायालयाने आर.जे. रेनॉल्ड्स टोबॅको कंपनीला दिले आहेत. शिवाय भरपाई म्हणून 108 कोटी रुपये देण्याचा न्यायालयाचा आदेश आहे.

सुमारे 20 वर्षे रोज सिगारेट ओढणार्‍या मायकेल जॉन्सनचा फुफ्फुसाच्या कर्करोगाने 1996मध्ये मृत्यू झाला. 2006मध्ये त्याची पत्नी सिंथिया रॉबिन्सनने कंपनीविरुद्ध खटला गुदरला. धूम्रपान हानिकारक असल्याचा इशारा कंपनीने दिला नसल्याचे त्यात म्हटले होते.

यामुळे आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा युक्तिवादही सिंथियाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता.
कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी...
० निकालामुळे तंबाखू कंपन्यांना धडा मिळेल व लोकांच्या आयुष्याशी होणारा खेळ त्या थांबवतील, असे सिंथियाचे वकील विली गॅरी यांनी म्हटले आहे.
० सिगारेट आरोग्यास हानिकारक ठरेल, असा इशारा कंपनीने दिला नाही. जाणूनबुजून धोका पत्करला. हा निष्काळजीपणा मायकेलच्या जिवावर बेतला.

20 वर्षे रोज 3 पाकिटे
13 व्या वर्षापासून धूम्रपान करणारा मायकेल 20 वर्षांपर्यंत रोज तीन पाकिटे सिगारेट ओढत राहिला. इच्छा असूनही अखेरपर्यंत त्याचे व्यसन सुटले नाही.