इंटरनॅशनल डेस्क - पॅरिसमध्ये नव्यानेच एक गॅरेज सुरू झाला आहे. त्यास 'ओन्ली गर्ल्स' असे नाव देण्यात आले आहे. या गॅरेजमध्ये फक्त महिला मॅकेनिक काम करताना दिसतात. पुरूष मॅकेनिक्सला कंटाळलेल्या स्त्रियांसाठी ही चांगली बातमी आहे. ही संकल्पना लोकांना आवडली आहे. कारण एक महिला दुस-या महिलेला योग्यरितीने ओळखते. दुसरीकडे पुरूष मॅकेनिक आम्हाला योग्यपध्दतीने वागणूक देत नाहीत. यामुळे बहुतेक महिला त्रस्त आहेत. महिलांच्या या गॅरेजचे इंटीरिअमध्ये हार्डवूड फ्लोअर, सुंदर वॉलपेपर्स आणि वेगवेगळ्या आकारातील मेणबत्त्या पाहावयास मिळतात.
येथे महिलांसाठी ब्युटी कॉर्नरही आहे. महिलांबरोबरच पुरूषमंडळीही गॅरेजमध्ये आपले कार दुरूस्तीसाठी आणतात. महिला मॅकेनिक्सकडे ऑटो मॅकेनिकचा तीन वर्षांची डिग्री आहे.
पुढे पाहा गॅरेजसंबंधित छायाचित्रे.....