सिडनी - सेंट्रल सिडनीतील मार्टिन पॅलेस येथील कॅफेमधील ओलिसांना सोडवण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहे. आतापर्यंत पाच जण दहशतवाद्याच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी ठरले आहेत. यावेळी एक महिला कॅफेमधून निघाली आणि थेट पोलिसांच्या दिशेने पळत सुटली. हे दृष्य जेवढे साहसी होते, तेवढेच भावूक करणारे होते. कॅफेमधून स्वतःची सुटका करुन घेतल्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये भीती दिसत होती. पोलिसांजवळ पोहोचल्यानंतर तिने त्यांना मिठी मारली आणि आसवांना वाट मोकळी करुन दिली.
रॉयटर्सने महिलेची कॅफेपासून पोलिसांपर्यंत पोहोचण्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. पोलिसाचा हात पकडल्यानंतर तिला रडू कोसळले. पोलिसांनी देखील तिला धीर दिला. पोलिसांनी कॅफेला चारही बाजूंनी वेढा टाकला आहे. कॅफेमध्ये अल कायदाशी संबंधीत जबाद अल नुसरा या संघटनेच्या एका दहशतवाद्याने अनेक लोकांना ओलिस ठेवले आहे. यात एक भारतीय असल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. मार्टिन पॅलेस येथे अनेक भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांची कार्यालये आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सिडनीतील आणखी छायाचित्रे ..