आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत सापडले शिख परिवारातील चार जण मृतावस्थेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉश्गिंटन - अमेरिकेतील अटलांटा येथे एका शिख कुटुंबातील चार सदस्य मृतावस्थेत आढळली आहेत. त्यांच्या मृत्यूबद्दल पोलिसांनी शंका उपस्थित केली असून ही हत्या आहे की, आत्महत्या याबद्दल अजून काहीही सांगण्यात आलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन लहान मुले आणि पती-पत्नी असे हे चौकोनी कुटुंब अटलांटा येथील जॉन्स क्रिक येथे राहात होते. सोमवारी त्यांच्या राहात्या घरात त्यांचे मृतदेह आढळून आले. पाच वर्षीय गुरतेज आणि १२ वर्षांचा सरताज या दोन्ही मुलांच्या गळ्यावर धारदार शस्त्रांने वार करण्यात आले आहेत तर, ४७ वर्षीय दमनजीत कौर यांच्या डोक्यात वार करण्यात आला आहे. कुटुंबप्रमुख शिवेंदर सिंग ग्रोव्हर (५२) यांचा मृतदेहही त्यांच्या जवळच पडलेला होता. ते अटलांटा येथील एका टेक्नॉलॉजी कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत होते. तसेच मिशिगन विद्यापीठात ते शिक्षण घेत होते.

जॉन्स क्रिक येथील पोलिस प्रमुख डेंसमोर यांनी मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले. या चार जणांच्या मृत्यूचे गुढ लवकरच उकलेले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे तपास पथकाने अशी शंका उपस्थित केली आहे की, शिवेंदर सिंग यांनी प्रथम पत्नी आणि दोन्ही मुलांची हत्या करुन नंतर स्वतः आत्महत्या केली असल्याची शक्यता आहे. शेजा-यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आनंदी कुटुंब म्हणून परिचीत होते. ग्रोव्हर हे स्वतः मुलांना शाळेत सोडत होते.