Home »International »Other Country» A Solar Superstorm Is Coming And We'll Only Get 30 Minute Warning

सौरवादळाचा परिणाम पृथ्वीवर होण्याचा धोका

वृत्तसंस्था | Feb 10, 2013, 05:17 AM IST

  • सौरवादळाचा परिणाम पृथ्वीवर होण्याचा धोका

लंडन - आगामी काळात पृथ्वीवर सौरवादळ धडकू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यांनी याला ‘सोलर सुपर स्टॉर्म’ असे नाव दिले असून असे वादळ शंभर-दोनशे वर्षांतून एकदा येते.

लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगने याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. यात म्हटले आहे की, ‘सुपर स्टॉर्म’ पृथ्वीवर धडकणार यात कोणतीही शंका नाही. परंतु ते कधी येणार व धडकणार हे आताच निश्चित सांगता येणार नाही. तज्ज्ञांनी असाही इशारा दिला आहे की, ‘या वादळामुळे दूरसंचार उपग्रहांचे नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर वीजपुरवठा, सागरी तसेच हवाई सेवाही प्रभावित होऊ शकते. अडचण अशी आहे की, या वादळाबाबत कुठलेच पूर्वानुमान करता येत नाही.’ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सूर्यापासून निघालेली अब्जावधी टन ऊर्जा ताशी 16.09 लाख किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने झेपावत आहे.

Next Article

Recommended